Home » राष्ट्रीय » जळगाव मनपात महिलांना संधी : प्रभाग आरक्षणाची सोडत जाहीर !

जळगाव मनपात महिलांना संधी : प्रभाग आरक्षणाची सोडत जाहीर !

जळगाव  : प्रतिनिधी

जळगाव शहर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांसाठी बहुप्रतीक्षित प्रभाग आरक्षणाची सोडत मंगळवार, दिनांक ११ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता महापालिकेच्या सभागृहात पार पडली. या सोडतीसाठी राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, इच्छुक उमेदवार आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.आरक्षण सोडतीचा कार्यक्रम दुसऱ्या सभागृहात चिठ्ठीद्वारे पार पडला. व्यासपीठावर आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, अतिरिक्त आयुक्त शोभा बाविस्कर, उपायुक्त निर्मला गायकवाड-पेखळे, नगररचनाकार अमोल पाटील, अभियंता योगेश वाणी आणि नगर सचिव मनोज शर्मा आदी अधिकारी उपस्थित होते.जळगाव शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आज प्रभागनिहाय आरक्षणाची सोडत पार पडली असून, अनुसूचित जाती-जमाती, नागरिकांचा मागासवर्ग तसेच महिलांसाठी मोठ्या प्रमाणावर जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. खाली प्रत्येक प्रभागानुसार (अ, ब, क, ड) आरक्षणाचा तपशील पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात आला आहे.

 प्रभाग क्रमांक १

अ – अनुसूचित जाती महिला

ब – नागरिकांचा मागासवर्ग

क – सर्वसाधारण महिला

ड – सर्वसाधारण

 प्रभाग क्रमांक २

अ – अनुसूचित जमाती

ब – नागरिकांचा मागासवर्ग महिला

क – सर्वसाधारण महिला

ड – सर्वसाधारण

 

प्रभाग क्रमांक ३

 

अ – अनुसूचित जाती महिला

ब – अनुसूचित जमाती महिला

क – नागरिकांचा मागासवर्ग

ड – सर्वसाधारण

 

 प्रभाग क्रमांक ४

 

अ – अनुसूचित जाती महिला

ब – नागरिकांचा मागासवर्ग

क – सर्वसाधारण महिला

ड – सर्वसाधारण

 

प्रभाग क्रमांक ५

 

अ – नागरिकांचा मागासवर्ग महिला

ब – सर्वसाधारण महिला

क – सर्वसाधारण महिला

ड – सर्वसाधारण

 

 प्रभाग क्रमांक ६

 

अ – नागरिकांचा मागासवर्ग महिला

ब – सर्वसाधारण महिला

क – सर्वसाधारण महिला

ड – सर्वसाधारण

 

प्रभाग क्रमांक ७

 

अ – नागरिकांचा मागासवर्ग महिला

ब – सर्वसाधारण महिला

क – सर्वसाधारण महिला

ड – सर्वसाधारण

 

 प्रभाग क्रमांक ८

 

अ – नागरिकांचा मागासवर्ग महिला

ब – सर्वसाधारण महिला

क – सर्वसाधारण महिला

ड – सर्वसाधारण

 

प्रभाग क्रमांक ९

 

अ – नागरिकांचा मागासवर्ग महिला

ब – सर्वसाधारण महिला

क – सर्वसाधारण महिला

ड – सर्वसाधारण

 

प्रभाग क्रमांक १०

 

अ – अनुसूचित जाती

ब – नागरिकांचा मागासवर्ग महिला

क – सर्वसाधारण महिला

ड – सर्वसाधारण

 

 प्रभाग क्रमांक ११

 

अ – अनुसूचित जमाती महिला

ब – नागरिकांचा मागासवर्ग

क – सर्वसाधारण महिला

ड – सर्वसाधारण

 

 प्रभाग क्रमांक १२

 

अ – अनुसूचित जाती

ब – नागरिकांचा मागासवर्ग महिला

क – सर्वसाधारण महिला

ड – सर्वसाधारण

 

 प्रभाग क्रमांक १३

 

अ – नागरिकांचा मागासवर्ग

ब – सर्वसाधारण महिला

क – सर्वसाधारण महिला

ड – सर्वसाधारण

 

 प्रभाग क्रमांक १४

 

अ – नागरिकांचा मागासवर्ग

ब – सर्वसाधारण महिला

क – सर्वसाधारण महिला

ड – सर्वसाधारण

 

प्रभाग क्रमांक १५

 

अ – नागरिकांचा मागासवर्ग महिला

ब – सर्वसाधारण महिला

क – सर्वसाधारण महिला

ड – सर्वसाधारण

 

प्रभाग क्रमांक १६

 

अ – नागरिकांचा मागासवर्ग महिला

ब – सर्वसाधारण महिला

क – सर्वसाधारण महिला

ड – सर्वसाधारण

 

 प्रभाग क्रमांक १७

 

अ – नागरिकांचा मागासवर्ग महिला

ब – सर्वसाधारण महिला

क – सर्वसाधारण महिला

ड – सर्वसाधारण

 

 प्रभाग क्रमांक १८

 

अ – अनुसूचित जमाती

ब – नागरिकांचा मागासवर्ग महिला

क – सर्वसाधारण महिला

 

प्रभाग क्रमांक १९

 

अ – नागरिकांचा मागासवर्ग महिला

ब – नागरिकांचा मागासवर्ग महिला

क – सर्वसाधारण महिला

ड – सर्वसाधारण महिला

या आरक्षणामुळे महिला उमेदवारांना मोठ्या प्रमाणात संधी मिळणार असून, मागील निवडणुकीच्या तुलनेत महिलांचा सहभाग लक्षणीय वाढणार आहे. काही प्रभागांमध्ये सलग दुसऱ्यांदा महिलांसाठी जागा राखीव झाल्याने नवे चेहरे उदयास येण्याची शक्यता आहे. आरक्षण निश्चित झाल्यानंतर आता उमेदवारांच्या चर्चांना वेग आला असून, सर्व पक्षांतर्गत समीकरणांची मांडणी सुरू झाली आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *