मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील जनतेला एक महत्वाची बातमी समोर आली आहे. रेशन कार्ड मध्यमवर्गीयांसाठी खूप महत्वाचे आहे. यामुळे दरमहा रेशन तर मिळतंच, पण त्याशिवाय इतरही अनेक सुविधांचा लाभ घेता येतो. पण अलीकडे राष्ट्रीय अन्न व रसद विभागाने रेशन कार्डाची ई-केवायसी प्रक्रिया सुरू केली आहे. शन कार्ड धारकांसाठी ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करणं आवश्यक आहे. नाहीतर रेशन कार्डाचे सर्व फायदे बंद होऊ शकतात.

रेशन कार्डाची केवायसी म्हणजे काय?
रेशन कार्डाची केवायसी म्हणजे ‘नो युवर कस्टमर’ ही भारत सरकारची एक योजना आहे. याचा उद्देश रेशन कार्ड धारकांची ओळख पडताळणं आणि बनावट रेशन कार्डांना आळा घालणं आहे. या प्रक्रियेमुळे फक्त पात्र व्यक्तींनाच सरकारी योजनांचा लाभ मिळेल, असं सरकारचं ध्येय आहे.
केवायसी करणे का गरजेची आहे?
पात्रतेची खात्री: केवायसीमुळे फक्त पात्र लोकांनाच रेशनची सबसिडी मिळेल आणि बनावट रेशन कार्डांचा वापर थांबेल.
कार्यक्षम वितरण: केवायसी डेटाच्या आधारे सरकार सबसिडीचं वितरण अधिक चांगल्या पद्धतीने करू शकेल आणि ती खऱ्या गरजूंना मिळतेय का, हे तपासू शकेल.
ऑनलाइन सुधारणा: केवायसीमुळे रेशन कार्डाच्या सेवा ऑनलाइन आणि पारदर्शी होतील, ज्यामुळे सर्वसामान्यांना फायदा होईल.
रेशन कार्डाची केवायसी कशी करायची?
रेशन कार्डाची केवायसी करण्याचे दोन पर्याय आहेत. एक ऑनलाइन आणि ऑफलाइन. दोन्ही पद्धती सोप्या आहेत, पण त्यासाठी काही कागदपत्रं तयार ठेवावी लागतील.
यासाठी आवश्यक कागदपत्रं कोणती?
1. रेशन कार्ड
2. आधार कार्ड
3. पॅन कार्ड (पर्यायी)
4. मतदार ओळखपत्र (पर्यायी)
5. पासपोर्ट (पर्यायी)
6. बँक पासबुक



