September 29, 2026 8:28 am

लाईव्ह न्यूज :
लाईव्ह न्यूज :

स्वच्छता ही आपल्या संस्कृतीची ओळख असून सामूहिक जबाबदारी – पालकमंत्री गुलाबराव पाटील

जळगाव : प्रतिनिधी ही मोहीम केवळ एका खड्ड्यापुरती मर्यादित नाही, तर ती आपल्या गावाच्या उज्ज्वल भविष्यासाठीचा संकल्प आहे, स्वच्छता म्हणजे फक्त शासकीय कार्यक्रम नाही, ती आपल्या संस्कृतीची ओळख असून सामूहिक जबाबदारीआहे. आजवर आपण घरटी शौचालय उभारून पहिला टप्पा पूर्ण केला आहे. पण आता वेळ आहे शिस्तबद्ध वापर, ओला-सुका कचरा विलगीकरण आणि त्याचे खतात रूपांतर यासाठी […]

समर एजन्सीला मध्यरात्री भीषण आग : इलेक्ट्रॉनिक वस्तू जळून खाक !

जळगाव : प्रतिनिधी शहरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या दुकानाला मध्यरात्री भीषण आग लागल्याची घटना घडली. शिवतीर्थ मैदानासमोर असलेल्या समर एजन्सी या दुकानात अग्नितांडव बघायला मिळाले. ही आग इतकी भयानक होती की संपूर्ण दुकानाच्या सर्व मजल्यांवर काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केले. या आगीत दुकानातील संपूर्ण कुलर, फ्रिजसह सर्व इलेक्ट्रॉनिक वस्तू जळून खाक झाल्या असून, प्राथमिक अंदाजानुसार जवळपास […]

धक्कादायक : अंत्यविधीसाठी गेलेल्या ग्रामस्थांवर मधमाशांनी चढविला हल्ला !

सातारा  : वृत्तसंस्था जिल्ह्यातील एका गावा विचित्र अपघात घडल्याचे समोर आले आहे. याचा व्हिडिओ देखील चांगलाच व्हायरल होत आहे. अंत्यविधीसाठी गेलेल्या लोकांवर मधमाशांचा हल्ला झाल्याचा हा प्रकार आहे. घडलेल्या घटनेत अनेक नागरिक जखमी झालेले आहेत. सविस्तर वृत्त असे कि, सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील पसरणी गावात हा धक्कादायक प्रकार घडलेला आहे. जिथे अंत्यविधीसाठी गेलेल्या ग्रामस्थांवर अचानक […]

खंडणीसाठी वृद्धाचे अपहरण ; दोन अटकेत तर दोन फरार !

जळगाव : प्रतिनिधी चाळीसगाव तालुक्यातील वाघले येथील ४२ वर्षीय गणेश ताराचंद राठोड यांचे अज्ञात व्यक्तींनी ३० मे २०२५ रोजी अपहरण केले होते आणि त्यांच्या सुटकेसाठी ४५ लाख रुपयांची खंडणी मागितली होती. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तातडीने तपास करत १२ तासात दोन आरोपींना अटक तर दोन फरार झाले […]

भरदुपारी विवाहितेने घेतला गळफास : माहेरच्या नातेवाईकांचा सासूसह ननंदेवर आरोप !

जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील किनोद येथील 26 वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आयुष्याची अखेर केल्याची घटना गुरुवारी (१ मे) समोर आली होती. दरम्यान ही आत्महत्या नसून सासू आणि ननंद यांनी तिचा गळा दाबून खून केल्याचा आरोप विवाहितेच्या माहेरच्या नातेवाईकांनी केला आहे. गायत्री ज्ञानेश्वर कोळी (वय 26 रा. किनोद ता. जळगाव) असे मयत विवाहितेचे नाव आहे. सविस्तर […]

आकाशवाणी चौकात भीषण अपघात : तरुणीच्या दोन्ही पायांचा झाला चुराडा !

जळगाव : प्रतिनिधी गेल्या काही महिन्यापासून शहरातील आकाशवाणी चौकात नेहमीच अपघाताच्या घटना घडत असतांना आता १ मे रोजी ट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीवर मागे तरुणीचे दोन्ही पायांचा चेंदामेंदा झाला असून दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी 1 मे रोजी रात्री 8 वाजता घडली आहे. जखमींवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील महाबळ परिसरातील […]

…अन्यथा होणार तुमचे रेशन कार्डाचे सर्व फायदे बंद !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील जनतेला एक महत्वाची बातमी समोर  आली आहे. रेशन कार्ड मध्यमवर्गीयांसाठी खूप महत्वाचे आहे. यामुळे दरमहा रेशन तर मिळतंच, पण त्याशिवाय इतरही अनेक सुविधांचा लाभ घेता येतो. पण अलीकडे राष्ट्रीय अन्न व रसद विभागाने रेशन कार्डाची ई-केवायसी प्रक्रिया सुरू केली आहे. शन कार्ड धारकांसाठी ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करणं आवश्यक आहे. […]

महसूल अधिकाऱ्यांच्या व कर्मचाऱ्यांच्या संगनमताने होते वाळू चोरी !

जळगाव : प्रतिनिधी           भाग – ३  जळगाव शहरातील अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात बांधकामाचे काम सुरू आहे या ठिकाणी शेकडो ब्रास अवैध वाळू मोठ्या प्रमाणात बांधकामासाठी टाकण्यात आलेली आहे. हे सर्व जळगाव शहरातील महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांना माहीत असल्यावर देखील या ठिकाणी कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही तर जळगाव शहरानजीक सुरू असलेल्या […]

जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे उद्घाटन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते संपन्न

जिल्हा रुग्णांना स्थानिक पातळीवरच मिळणार आर्थिक मदतीसाठी मार्गदर्शन जळगाव : प्रतिनिधी राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरजू रुग्णांना वैद्यकीय उपचारासाठी तात्काळ मदत मिळावी, याकरिता जिल्हास्तरावर ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष’ स्थापन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. त्यानुसार महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून जिल्हाधिकारी कार्यालयात या कक्षाचे उद्घाटन मा. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या […]

चालू असलेल्या कामांमध्ये काही अडथळे येऊ शकतात.

मेष राशी श्री गणेश म्हणतात की, वेळ सामान्यपणे जाईल. पण विचित्र परिस्थितीतही तुम्ही तुमचा संयम राखाल. यावेळी आरोग्याशी संबंधित कामांवर खर्च जास्त असेल. कोणाबद्दलही नकारात्मक विचार मनात येऊ देऊ नका. कोणत्याही अनुचित किंवा बेकायदेशीर कामात रस घेतल्याने अपमानास्पद परिस्थिती निर्माण होऊ शकते. व्यवसायात अधिक गंभीर विचार आणि मूल्यांकन करण्याची आवश्यकता आहे. पती-पत्नींचे एकमेकांशी चांगले संबंध […]

error: Content is protected !!