Home » महाराष्ट्र » आमच्या जीवितास धोका ; धनंजय देशमुख लवकरच घेणार निर्णय !

आमच्या जीवितास धोका ; धनंजय देशमुख लवकरच घेणार निर्णय !

बीड : वृत्तसंस्था

राज्यात गेल्या काही महिन्यापासून बीड जिल्हा अनेक घटनामुळे चर्चेत येत असतांना आता पुन्हा एकदा मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करण्यात होती. या घटनेनंतर वाल्मिक कराडसह इतर आरोपी मकोका अंतर्गत अटकेत आहेत. या प्रकरणाला 6 महिने पूर्ण झाले असून अद्यापही कृष्णा आंधळे हा आरोपी फरार आहे. याप्रकरणी आता सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी कृष्णा आंधळेपासून आमच्या जीवितास धोका आहे. त्याला अटक न केल्यास मी लवकरच कठोर निर्णय घेणार असल्याचे सांगितले आहे.

धनंजय देशमुख काय म्हणाले? 

‘फरार आरोपी कृष्णा आंधळेला अटक करा ही आमची वारंवार मागणी आहे. जेल प्रशासनातील मागील काही दिवसांपासून दिली जाणारी व्हीआयपी ट्रीटमेंट बघता आरोपींना वेगवेगळ्या कारागृहात पाठवावं ही आमची मागणी होती. पण तसं काहीही झालं नाही. त्यावेळेस असं सगळं असताना बीड कोर्टात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चिन्ह असलेल्या गाड्या, पदाधिकारी, आरोपींचे समर्थन करणारे लोक मोठ्या प्रमाणात येत देशमुख कुटुंबावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत,’ असे धनंजय देशमुख म्हणाले.

“इतर प्रकरणातील आरोपी जेर बंद होतात, पण देशमुख कुटुंबातील कृष्णा आंधळे अद्यापही फरार आहे. त्याच्यापासून आमच्या जीविताला धोका आहे. त्यामुळे लवकरात लवकर कृष्णा आंधळेला अटक करण्यासाठी मी कठोर निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. याची संपूर्ण जबाबदारी संबंधित प्रशासनाची असेल. या मागणीची गंभीर दखल घ्यावी’, असे धनंजय देशमुख म्हणाले.

 

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *