Home » राष्ट्रीय » संतापजनक : गोळी खावून अल्पवयीन मुलाने केला ५ वर्षीय बालिकेवर अत्याचार !

संतापजनक : गोळी खावून अल्पवयीन मुलाने केला ५ वर्षीय बालिकेवर अत्याचार !

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील मुंबईतील कांदिवली पश्चिम येथील लालजी पाडा परिसरात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. एका १६ वर्षीय मुलाने ५ वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून, स्थानिकांनी आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, पीडित ५ वर्षीय चिमुरडी घराबाहेर खेळत होती. त्याचवेळी त्यांच्या शेजारी असलेल्या १६ वर्षीय मुलाने तिला गोड बोलून आपल्या घरात बोलावले. घरात बोलावल्यानंतर नराधमाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या घटनेची माहिती शेजाऱ्यांना मिळाली. त्यांनी पाहिले असता, चिमुरडीच्या प्रायव्हेट पार्टमधून रक्तस्त्राव थांबत नव्हता. त्यानंतर पीडितेला तातडीने जवळच्या शताब्दी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत.

या घटनेनंतर, पोलिसांनी संशयित मुलाला ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेतलेल्या मुलाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यामध्ये तो सांगतो की, त्याने एक गोळी खाल्लेली होती. त्या गोळीचा परिणाम झाल्यामुळे त्याचे डोके जड झाले आणि त्याला काही सुचले नाही. त्यानंतर त्याने हे कृत्य केले. कांदिवली पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. या अत्यंत धक्कादायक घटनेमुळे लालजी पाडा परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. संतप्त स्थानिक नागरिक आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करत आहेत. ‘अशा नराधमांना कठोर शिक्षा झाल्यास समाजात जरब बसेल,’ अशी भावना नागरिक व्यक्त करत आहेत.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *