मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक ठिकाणी अल्पवयीन मुलीसह विवाहितेवर अत्याचाराच्या घटना घडत असतांना आता मुंबईच्या मालवणी परिसरातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका 14 वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींनी अल्पवयीन मुलीला धमकावत तिच्यावर अत्याचार केला.

पीडित मुलीच्या कुटुंबियांनी तक्रार दाखल करताना म्हटले आहे की, काही दिवसांपूर्वी मुलीवर दोन जणांनी धमकी देत अत्याचार केला. 6 जून रोजी पीडितेची ती अश्लील क्लिप तिच्या आईला पाठविण्यात आली. तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. या नंतर त्यांनी मालवणी पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.
पीडित अल्पवयीन मुलगी फेब्रुवारी महिन्यात मैत्रीणीच्या बर्थडे पार्टीला तिच्या घरी गेली होती. त्यावेळी मैत्रीणीच्या घरी कोणीही नव्हते. पण मैत्रीणीने थोडावेळाने एक काम आहे असे सांगून घराबाहेर पडली. यावेळी एक 23 वर्षाचा एक तरुण आला. याच तरुणाने पीडित मुलीवर बलात्कार करत त्याचे चित्रीकरण केले. या व्हिडिओ त्याने दुसऱ्या मित्राला पाठवला त्याने या व्हिडिओच्या माध्यमातून मुलीला धमकी देण्यास सुरुवात केली. सोशल मिडीयावर हे सर्व अपलोड करेल अशी धमकी देत त्याने लॉजवर नेत तिच्यावर अत्याचार केला. यानंतर हा व्हिडिओ तिच्या आईला पाठवल्याने हा प्रकार उघडकीस आला.
या प्रकरणी मालवणी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम 64 (1), 56 (1), 3 (5) अन्वये बलात्काराचा गुन्हा नोंदवला आहे. तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार अश्लील व्हिडिओ प्रसारित केल्याबद्दल स्वतंत्र गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्वरीत तपास सुरू करत दोघा आरोपींना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एक 23 वर्षांचा असून ओला चालक आहे. दुसरा आरोपी मालवणी परिसरात पाळीव कुत्रा सांभाळण्याचे काम करतो.
आपली बदनामी होईल या भीतीने ती नाइलाजास्तव त्याला भेटायला गेली. त्या आरोपीनं पीडितेला गोराई येथील एका लॉजमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केला. हा प्रकार इथंच थांबला नाही, त्यानंतर दीड महिन्याच्या काळात दोन्ही आरोपींनी तिला वारंवार धमकावून तिच्यावर बलात्कार केला.



