Home » जळगाव » पाचोरा : २५ वर्षीय तरुणाने राहत्या घरात संपविली जीवनयात्रा !

पाचोरा : २५ वर्षीय तरुणाने राहत्या घरात संपविली जीवनयात्रा !

पाचोरा : प्रतिनिधी

तालुक्यातील बांबरुड महादेवाचे येथे एका २५ वर्षीय तरुणाने गळफास लावून आपली जीवन यात्रा संपविल्याची घटना घडली आहे. या घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा तालुक्यातील बांबरुड महादेवाचे येथील रहिवासी शशिकांत विठ्ठल पाटील (वय २५) या तरुणाने आपल्या राहत्या घरात गळफास लावून आपली जीवन यात्रा संपविल्याची घटना घडली आहे. हा प्रकार घरच्या मंडळींच्या लक्षात येताच शशिकांत पाटील यास तात्काळ पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी शशिकांत पाटील यांना मृत घोषित केले. मयत शशिकांत पाटील याच्या पश्चात्य वृद्ध आई, वडिल, एक भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे. शशिकांत पाटील याने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले याचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार तुषार विसपुते हे करीत आहे.

 

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *