जरांगे पाटील पुन्हा बरसले : आम्ही जाणार अन्यथा सरकार जाणार !

मुंबई : वृत्तसंस्था मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा मुंबईला धडकणार असल्याचा इशारा दिला आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्षात ठेवावे, असा एल्गार देखील त्यांनी केला आहे. मराठा आरक्षण आणि मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्याकांड प्रकरण मनोज जरांगे यांनी चांगलेच लावून धरले आहे. यावरून मनोज जरांगे सातत्याने महायुती सरकारवर टीका करत आहेत. […]
मोठी बातमी : आता होणार प्रार्थनास्थळांवरील भोंग्यांवर कारवाई !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रार्थनास्थळांवरील भोंग्यांवर अत्यंत कठोर भूमिका घेतली आहे. फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत बोलताना सुप्रीम कोर्टाच्या आदेशांचा दाखला देत रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत भोंगे बंद ठेवण्याची ताकीद दिली. तसेच या प्रकरणी आवाजाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसी कारवाई करण्याचाही इशारा दिला. यावेळी त्यांनी हे भोंगे बंद […]
भयानक : मध्यरात्री झोपलेल्या तीन मजुरांना भरधाव वाहनाने चिरडले !

जळगाव : प्रतिनिधी शहरापासून जवळ असलेल्या जळगाव खुर्द गावानजीक रेल्वे उड्डाणपुलाच्या बाजूला सुरू असलेल्या सर्व्हिस रोडच्या कामाच्या ठिकाणी भीषण अपघात घडला आहे. मध्यरात्री झोपलेल्या तीन परप्रांतीय मजुरांना अज्ञात अवजड वाहनाने चिरडल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (११ मार्च) सकाळी ७ वाजता उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही. याप्रकरणी नशिराबाद पोलीस […]
आरएसएसच्या प्रशिक्षण शिबिरावर दगडफेक : पाच जणांना घेतले ताब्यात !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील अनेक ठिकाणी गुन्हेगारी घटना सातत्याने समोर येत असतांना आता एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) प्रशिक्षण शिबिरावर दगडफेक झाल्याची घटना रविवारी रात्री घडली होती. या प्रकरणानंतर संघाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने एकत्र आले. या कार्यकर्त्यांनी शक्तीप्रदर्शन केले. दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तसेच पोलिसांनी दगडफेक करणाऱ्या […]
शिंदेंनी दिला कॉंग्रेसला दुसरा मोठा धक्का : माजी आमदार करणार पक्ष प्रवेश !

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या दोन दिवसापासून कॉंग्रेसला एकापोठापाठ एक धक्के बसत असतांना आता काँग्रेस पक्षाचे माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर अखेर हात सोडून धनुष्यबाण हाती घेणार असल्याचे निश्चित झाले असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हिंगोलीत मोठा मेळावा घेऊन शिंदेसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यामुळे जिल्हयाच्या राजकारणात काँग्रेसला मोठा धक्का मानला जात आहे. हिंगोली जिल्हा काँग्रेस […]
“तुला सोडणार नाही…” म्हणत शरद पवारांच्या आमदाराने दिली अधिकाऱ्याला धमकी !

बीड : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यापासून बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी व राजकीय नेत्यांची मोठी अडचण वाढत असतांना आता याच दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. कथित ऑडिओ क्लिपमध्ये संदीप क्षीरसागर हे बीडच्या नायब तहसीलदारांना धमकावत असल्याचा दावा करण्यात आला आहे. संबंधित क्लिप ही 2023ची असल्याचे […]
उद्धव ठाकरेंचा घणाघात : महायुतीच्या अर्थसंकल्पावर ओढले ताशेरे !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारने नुकताच अर्थसंकल्प जाहीर केला आहे. यानंतर आता सर्वच विरोधकांनी महायुती सरकारच्या अर्थसंकल्पावर ताशेरे ओढले आहे. विद्यमान सरकारचा पहिलाच अर्थसंकल्प असल्याने आधी दिलेली आश्वासने आणि पाच वर्षांत करायची नवी कामे याची नोंद त्यात दिसेल, अशी जनतेची भाबडी अपेक्षा होती. मात्र राज्यकर्त्यांनी पहिल्याच अर्थसंकल्पात त्यांच्या ‘गरज सरो वैद्य मरो’ या मानसिकतेचे […]
पाचोरा : २५ वर्षीय तरुणाने राहत्या घरात संपविली जीवनयात्रा !

पाचोरा : प्रतिनिधी तालुक्यातील बांबरुड महादेवाचे येथे एका २५ वर्षीय तरुणाने गळफास लावून आपली जीवन यात्रा संपविल्याची घटना घडली आहे. या घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा तालुक्यातील बांबरुड महादेवाचे येथील रहिवासी शशिकांत विठ्ठल पाटील (वय २५) या तरुणाने आपल्या राहत्या घरात गळफास लावून आपली जीवन यात्रा संपविल्याची […]
व्यवसायाशी संबंधित कामे सामान्य गतीने सुरळीत होतील

आजचे राशिभविष्य दि.११ मार्च २०२५ मेष राशी श्रीगणेश म्हणतात की, आज ग्रहांची स्थिती अनुकूल आहे. तुमच्या नियोजित कामांना सकारात्मक दिशा मिळेल. पूर्ण आत्मविश्वासाने काम करा. जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार पूर्ण होण्याची शक्यता. विद्यार्थी आणि तरुणांना समस्यांवर उपाय सापडेल. स्पर्धकांच्या हालचालींकडे दुर्लक्ष करू नका. पैशांच्या व्यवहाराशी संबंधित कोणतेही काम अत्यंत सावधगिरीने करा. वृषभ राशी भविष्याशी संबंधित कोणतेही […]