Home » जळगाव » पाचोरा : प्रेमी युगलाने घेतली रेल्वे खाली उडी !

पाचोरा : प्रेमी युगलाने घेतली रेल्वे खाली उडी !

पाचोरा : प्रतिनिधी

तालुक्यातील परधाडे येथे विवाहित असलेल्या प्रेमी युगलाने रेल्वे खाली उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. प्रेमी पुरुष व महिला दोघेही विवाहित असल्याने दोघांच्या घरच्यांकडुन या प्रेम संबंधाला विरोध असल्याने त्यांनी सोबत आत्महत्या करण्याचे टोकाचे पाऊल उचलण्याचे बोलले जात आहे. घटने प्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार भगवान चौधरी हे करीत आहे.

सविस्तर वृत्त असे कि, तालुक्यातील परधाडे येथील योगेश रामदास ठाकरे (वय – ३५) व मीना बबलू ठाकरे (वय – २८) यांचे गेल्या एका वर्षापासून दोघांमध्ये प्रेम संबंध निर्माण झाले होते. योगेश ठाकरे यास त्याच्या पत्नीपासून तीन मुले व मीना बबलू ठाकरे हीस बबलू ठाकरे यांच्यापासून तीन मुले आहेत. मात्र दोघे घराच्या काही अंतरापासून राहत असल्याने दोघांचे प्रेम संबंध जुळले. हा प्रकार योगेशची पत्नी व मिना ठाकरे यांचे पतीस माहित पडल्याने दोघं कुटुंबाकडून या अनैतिक संबंधाला मोठा विरोध होऊ लागला होता.

दरम्यान योगेश ठाकरे हा गेल्या तीन महिन्यापासून चाळीसगाव तालुक्यात त्याच्या बहिणीच्या गावी राहत होता. महिन्यानंतर तो तीन दिवसांपूर्वी परधाडे येथे आल्यानंतर दोघांनी एक विचार करून मंगळवारी दुपारी तीन वाजेच्या दरम्यान घरातून पलायन केले. त्यांचा अनेक ठिकाणी शोध घेतला मात्र बुधवारी सकाळी दहा वाजेच्या दरम्यान डाऊन साइटवरील रेल्वे कि. मी. खंबा नंबर ३८४ / २५ दरम्यान त्यांचा मृतदेह आढळून आला.

सदरची घटना परधाडे येथील गॅंगमनला दिसल्याने त्यांनी पाचोरा येथील स्टेशन मास्तरला व रेल्वे स्टेशनच्या ३४ भ्रमणध्वनी द्वारे कळविली. मात्र सदरचा प्रकार हा पाचोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत परधाडे ते वडगाव दरम्यान घडल्याने घटनास्थळी पो. काॅ. योगेश पाटील, पो. काॅ. हरीश परदेशी, रुग्णवाहिका चालक किशोर लोहार, मंगेश पाटील यांनी जाऊन दोघ मयतांचे मृतदेह येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

योगेश रामदास ठाकरे व मीना बबलू ठाकरे यांचे गेल्या वर्षापासून अनैतिक संबंध असल्याने मंगळवारी त्यांनी रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली. याबाबतची माहिती मीना ठाकरे हिचा पती बबलू ठाकरे यास सकाळी कळताच बबलू ठाकरे हा सकाळपासूनच दारूच्या नशेत तर्र होता. त्याने पत्नी मीना ठाकरे याचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला.

योगेश ठाकरे व मीना बबलू ठाकरे यांचे एक वर्षापासून अनैतिक संबंध असल्यामुळे व त्यांचे पितळ उघडे पडल्याने दोघांच्या घरून या प्रकरणाला विरोध होता. घरात भांडण होत असल्याने योगेश ठाकरे गेल्या तीन महिन्यापासून त्याचा बहिणीकडे बाहेरगावी राहण्यासाठी केला होता. मात्र गेल्या तीन दिवसापूर्वीच योगेश ठाकरे घरी आल्यानंतर अवघ्या दोन दिवसात योगेश ठाकरे व मीना ठाकरे यांनी दोघे मिळून एकाच वेळी आपले जीवन संपविले

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *