Home » राष्ट्रीय » पाकिस्तान आता साखळी बॉम्बस्फोटाने हादरले !

पाकिस्तान आता साखळी बॉम्बस्फोटाने हादरले !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

पहलगाम हल्ल्याचा बदला म्हणून भारताने ९ दहशतवादी तळ नष्ट केल्याची घटना घडल्यानंतर आता पाकिस्तान पूर्णतः हादरले आहे. पाकिस्तानातील आता कराचीमध्येही बॉम्बस्फोट झाला आहे. त्यामुळे पाकिस्तानात सध्या भितीचे वातावरण पसरले आहे. याआधी पाकिस्तानच्या लाहोरमध्ये नौदलाच्या मुख्यालयातही स्फोट झाला. लाहोर, रावळपिंडी आणि कराची विमानतळ यापूर्वीच बंद करण्यात आले आहेत. पाकिस्तान यात भारताचा हात असल्याची शक्यता वर्तवत आहे. पण भारताने यास नकार दिला आहे. पाकच्या मॉक ड्रिलमध्ये काहीतरी गडबड झाली असेल, असे भारताने म्हटले आहे.

भारताने पाकिस्तानमध्ये घुसून ऑपरेशन सिंदूरअंतर्गत एअर स्ट्राईक केले. या एअर स्ट्राईकद्वारे भारताने पाकिस्तानमधील ९ दहशतवादी तळ नष्ट केले. भारताने केलेल्या या हल्ल्याने पाकिस्तान चांगलाच हादरला आहे. यातून बाहेर येत नाही तोवर पाकिस्तानला आणखी धक्के बसले आहेत. पाकिस्तान आता साखळी बॉम्बस्फोटाने हादरले आहे. पाकिस्तानच्या ६ शहरामध्ये १२ ड्रोन हल्ले करण्यात आले आहेत. यामुळे पाकिस्तानी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *