Home » जळगाव » ३६ तासात पोलिसांनी बालकाच्या खुनातील संशयितांना घेतले ताब्यात !

३६ तासात पोलिसांनी बालकाच्या खुनातील संशयितांना घेतले ताब्यात !

जळगाव : प्रतिनिधी

बाजारात फिरतांना धक्का लागल्याने मारेकऱ्यांनी बालकाला मारहाण करीत संशयितांनी तेजस गजानन महाजन (वय १४, रा. रिंगणगाव, ता. एरंडोल) चाकूने गळा चिरुन खून केला. त्यानंतर मृतदेह खांद्यावरुन नेत झुडपात फेकून देणाऱ्या तिघांचा एलसीबीने पर्दाफाश केला.कुठलाही पुरावा नसतांना पोलिसांनी तपासचक्रे फिरवित ३६ तासात गुन्ह्याचा उलगडा केला असून एकाला पळून जात असतांना तर दुसऱ्या मध्यप्रदेशातून अटक केली. तर तिसऱ्या संशयिताचा शोध घेतला जात आहे.

सविस्तर वृत्त असे कि, बेपत्ता असलेल्या तेजस महाजन या बालकाचा मंगळवारी सकाळी रिंगणगाव- खर्चे रस्त्यालगत असलेल्या काटेरी झुडपात गळा चिरलेल्या अवस्थेत मृतदेह मिळून आला होता. ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी एरंडोल पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेला हा गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पोलिसांनी मंगळवारी गावात बाजार असल्याने सायंकाळी ७ वाजता तेजस हा खर्चे गावाकडे जातांना दिसल्याने पोलिसांनी आजूबाजूला राहणाऱ्यांची चौकशी केली मात्र त्यांना तपासाचा कुठलाही धागा मिळत नव्हता. पेरणीचे दिवस असतांना संशयित हे मालकाला न सांगता निघून गेल्यामुळे पोलिसांचा त्याच्यावरील संशय बळावला. त्याच्या शोधार्थ एलसीबीचे तीन पथके रवाना झाली. दरम्यान, पोलीस कर्मचारी गौरव पाटील यांनी तांत्रिक विश्लेषण करीत वास्कले याचा शोध घेतला. दरम्यान, तो फैजपूर-रावेरमार्गे मध्यप्रदेशकडे जात असल्याचे समजले.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, डीवायएसपी सागर कोते, आण्णासाहेब घोलप, केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोनि संदीप पाटील, एरंडोल पोनि निलेश गायकवाड यांच्यासह पोउनि सोपान गोरे, शरद बागल, श्री. डोमाळे, श्रीकृष्ण देशमुख, रवी नरवाडे, अकरम याकुब, हरिलाल पाटील, विजय पाटील, दीपक पाटील, विष्णू बिहऱ्हाळे, प्रवीण मांडोळे, संदीप चव्हाण, गोपाळ गव्हाळे, यशवंत टहाकळे, बबन पाटील, प्रदीप सपकाळे, प्रियंका कोळी, महेश सोमवंशी, संदीप पाटील, किशोर पाटील, प्रदीप चवरे, विलेश सोनवणे, रविंद्र पाटील यांच्या पथकाने केली.

ज्या शेतामध्ये तेजसचा मृतदेह मिळून आला, तेथून ५० फुट अंतरावर मध्यप्रदेशातील एक कुटुंब राहत होते. त्यांची चौक-शी केली असता, तेथे राहणारा हरदास वास्कले व त्यांच्या शेजारी राहणारा सुरेश खरते हे नातेवाईकांच्या लग्नासाठी सकाळीच मध्यप्रदेशातील खरगोण येथे रवाना झाल्याची माहिती पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना मिळाली. हाच तपासाचा धागा गवसताच पोलिसांनी तपासचक्रे फिरवली. पोलीस अधीक्षक रेड्डी यांनी फैजपूर व रावेर पोलिसांना मध्यप्रदेशच्या सीमावर्ती भागात नाकाबंदी लावण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार नाकाबंदी सुरु असतांना संशयित हरदास वास्कले हा दुचाकीवरुन येतांना दिसताच सपोनि रामेश्वर मोताळे यांच्यासह पथकाने त्याच्या मुसक्या आवळल्या. त्याची कसून चौकशी केल्यानंतर त्याने शेजारी राहणारा सुरेश खरते व गावातील रिचडीया कटोले यांच्या मदतीने त्याचा खून केल्याची कबुली दिली. त्यानंतर दुसरे पथक संशयीत सुरेश खरते याच्या शोधार्थ पथक मध्यप्रदेशकडे रवाना झाले. खरते हा मध्यप्रदेशातील धुपा या गावात असल्याचे समजताच पथकाने दहा किमी पायी जावून संशयित सुरेश खरते याला अटक केली. तसेच त्यांचा तिसरा साथीदार रिचडीया कटोले याचा देखील पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *