धरणगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील पाळधी येथील पोलिस चौकीत दाखल असलेल्या गुन्ह्यात चौकशीसाठी बोलाविले असता आरोपींनी धक्काबुक्की करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याने खळबळ उडाली असून, याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे. दोन जण फरार आहेत.

बसस्थानक परिसरात तीन दिवसांपूर्वी हाणामारी झाली होती. याप्रकरणी पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली होती. याची चौकशी करण्यासाठी पाळधी पोलिसांनी त्यांना चौकीत बोलाविले असता त्यांनी तेथेच हाणामारी सुरू केली. ही हाणामारी सोडविण्यासाठी गेलेल्या प्रवीण तांदळे यांचा शर्ट फाडून त्यावर असलेली लाइन यार्ड फाडून फेकून दिली. मुस्तकिम पटेल याने तेथे असलेली काठी उचलून सुनील पाटील यांच्या हातावर मारली. याप्रकरणी सुनील पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मुस्तकिम अजीज पटेल, नीलेश सुरेश वानखेडे, अनिकेत धनराज महाजन यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एक महिला व अल्पवयीन मुलगा फरार झाले आहेत.



