Home » जळगाव » भुसावळ » दरोडा टाकण्यासाठी सज्ज असलेली टोळीतील तिघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या !

दरोडा टाकण्यासाठी सज्ज असलेली टोळीतील तिघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या !

भुसावळ : प्रतिनिधी

बाजारपेठ पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने पथकाने निवडणूक पार्श्वभूमीवर शहरात गस्त घालत असताना २६ नोव्हेंबर रोजी रात्री काळा हनुमान मंदिरासमोरील भाजी मार्केट परिसरात दरोडा टाकण्यासाठी एकत्र जमलेल्या आरोपी टोळीपैकी तिघांना रंगेहाथ पकडले. पथकाने मोठ्या प्रमाणात घातक हत्यारे, तीन विनानंबर मोटारसायकली, मोबाइल फोन व इतर साहित्य जप्त केले आहे. उर्वरित पाच जण अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले. दरम्यान, गुरुवारी (२७नोव्हेंबर) सकाळी आणखी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

बुधवारी रात्री सुमारे १० वाजेच्या सुमारास पो. नि. राहुल वाघ यांच्या नेतृत्वाखालील पोलिस उपनिरीक्षक मंगेश जाधव पो. हे. कॉ. विजय नेरकर, कांतीलाल केदारे, रमण सुरळकर, प्रमोद तायडे, सोपान पाटील, पो.कॉ. सचिन चौधरी, हर्षल महाजन, प्रशांत सोनार, जावेद शहा, भूषण चौधरी, गौरव सपकाळे आदींची टीम शहरात पेट्रोलिंग करत होती. आदर्श पॅकेजिंग दुकानाच्या मागे काही लोक संशयास्पदरीत्या हालचाल करत असल्याचे दिसताच पथकाने तत्काळ त्या दिशेने मोर्चा वळवला. पोलिसांनी केलेल्या चौकशीत संशयित आरोपींनी उर्वरित साथीदारांची नावेही सांगितली त्यात मयूर टाक, आशिष चोटी, वीरेंद्र ऊर्फ भय्यू कडोले, हनी ठाकूर, आणखी एक साथीदार (नाव अज्ञात) यांचा समावेश आहे. सर्व आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच विभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित यांनी रात्रीच घटनास्थळी भेट देऊन माहिती जाणून घेतली.

पोलिसांना पाहताच आठ जणांनी पळण्याचा प्रयत्न केला. पाठलाग करून तिघांना पकडण्यात यश आले. त्यात शुभम दुर्गाप्रसाद ओनकर (वय २४), मृत्युंजय ऊर्फ भोला सत्येंद्र कवीशेखर (४३), राजू ऊर्फ शिवकुमार भगवानदास माणिक (१९) या तिघांचा समावेश आहे. तिघेही मध्यप्रदेशातील हरदा जिल्ह्यातील रहिवासी आहे. यावेळी मृत्युंजयच्या कब्जातून गावठी पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे, शुभम ओनकरकडून चॉपर, शिवकुमार माणिककडून मिरची स्प्रे व २० फूट लांबीचा दोर, दोन मोबाइल फोन, तीन विनानंबर मोटारसायकली आदी जप्त करण्यात आले आहे. चौकशीदरम्यान आरोपींनी धक्कादायक माहिती दिली. भुसावळातील बंटी परशुराम पथरोड व शिव पथरोड यांनी त्यांना भुसावळात बोलावून अभिषेक जवाहरलाल गौर व तेजस टकले यांच्याकडे पाठवले होते. या दोघांनी सराफ बाजारातील दुकाने व बंगले दाखवून दरोडा टाकण्याची योजना आखली होती. त्याच नियोजनात आरोपी मंडळी त्या ठिकाणी जमले होते; परंतु पोलिसांनी वेळेत येऊन कट हाणून पाडला. या गुन्ह्यात गुन्हे शाखेने तपासाचा वेग वाढवत अरुण रंधे आणि तेजस टकले या दोघांना अटक केली. सर्व पाचही संशयित आरोपींना येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. बी. तिवारी यांच्या न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना १ डिसेंबरपर्यंत पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *