September 22, 2026 1:16 pm

लाईव्ह न्यूज :
लाईव्ह न्यूज :

“निवडणुका मोकळ्या, पण ओबीसी आरक्षणावर संकट कायम : वडेट्टीवारांचा भाजपवर निशाणा”

नागपूर : वृत्तसंस्था स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती न देता निवडणूक प्रक्रिया सुरू करण्यास परवानगी दिली असली तरी ओबीसी आरक्षणाचा मुद्दा कायम अनिश्चित राहिला आहे. त्यामुळे न्यायालयाचा आजचा आदेश हा ओबीसी समाजाला दिलासा देणारा नाही, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिली. सर्वोच्च न्यायालयाने 50 टक्के आरक्षण मर्यादा ओलांडू नये, असे […]

महाराष्ट्राच्या प्रशासकीय नेतृत्वात मोठा बदल ; राज्याला मिळाले नवे मुख्य सचिव !

मुंबई : वृत्तसंस्था महाराष्ट्राच्या प्रशासकीय नेतृत्वात मोठा बदल होत असून वरिष्ठ आयएएस अधिकारी राजेश अग्रवाल यांची राज्याच्या नव्या मुख्य सचिवपदी नियुक्ती केली जात आहे. राज्य शासनाच्या मागणीनंतर केंद्राने त्यांची केंद्रातील जबाबदारीतून मुक्तता केली असून ते आता महाराष्ट्र प्रशासनातील सर्वोच्च अधिकारी म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. सध्याचे मुख्य सचिव राजेश कुमार मीणा यांची मुदत 30 नोव्हेंबरला पूर्ण […]

महा-युतीत तडे? २ डिसेंबरवरून शिवसेना–भाजप आमनेसामने !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्ताने सत्ताधारी शिवसेना व भाजपमधील राजकीय कटूता वाढल्याचे चित्र आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आपल्याला कोणत्याही स्थितीत 2 डिसेंबरपर्यंत महायुती टिकवायची आहे असे विधान केल्यानंतर आता मंत्री गणेश नाईक यांनीही शिवसेनाला ढकलण्यासंबंधीचे विधान केले आहे. त्यामुळे सत्ताधारी महायुतीत 2 डिसेंबरनंतर फूट पडणार का? असा प्रश्न उपस्थित […]

पार्थ पवार अडचणीत? ; दमानियांची दिल्लीत धडाकेबाज मोहीम !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारमधील उपमुख्यमंत्री अजित पवार आता मोठ्या अडचणीत येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पुण्यातील मुंढवा भूखंड घोटाळ्याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. या प्रकरणात सातत्याने कारवाईची मागणी करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आज दिल्ली दौऱ्यावर असून, त्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट […]

सुप्रीम कोर्टाचा निर्णय: महाराष्ट्रातील निवडणुका ‘ऑन शेड्यूल’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था सर्वोच्च न्यायालयानं महाराष्ट्रातील नगर परिषद आणि नगरपालिकांच्या निवडणुका ठरलेल्या वेळेतच होणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. मात्र ओबीसी आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडल्यासंदर्भातील वादग्रस्त प्रकरण तीन सदस्यीय घटनापीठाकडे वर्ग करण्यात येणार असल्याचंही न्यायालयानं सांगितलं. त्यामुळे अनेक उमेदवारांच्या भवितव्यावर अनिश्चिततेची स्थिती कायम राहणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमधील ओबीसी आरक्षण मर्यादा ओलांडल्याबाबत आज […]

तब्बल 52 लाख लाभार्थी महिला ठरल्या अपात्र !

मुंबई : प्रतिनिधी ज्या कुटुंबांचं आर्थिक उत्पन्न हे अडीच लाख रुपयांपेक्षा कमी आहे, अशा गरीब कुटुंबातील महिलांसाठी राज्य सरकारने लाडकी बहीण ही योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला दीड हजार रुपये जमा करण्यात येतात. ही एक राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे. विधानसभा निवडणुकीच्या काही महिने आधी ही योजना सुरू […]

खासदारांचं काम तुतारी वाजवणं हे असतं ; आ.मुंडेंनी घेतला खासदारांचा समाचार !

बीड : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यापासून अजित पवार गटाचे नेते माजी मंत्री व आ. धनंजय मुंडे हे अनेक अडचणीत आले होते. आता निवडणुकीच्या प्रचारासाठी ते मैदानात उतरले असून आता ते विरोधकांवर जोरदार हल्लाबोल करीत आहे. परळीतील विकासकामांवर आणि जनतेशी असलेल्या नात्यावर पुन्हा एकदा भर देत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार व माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी […]

हॉटेल विक्रीच्या व्यवहारातून वाद चिघळला; रुममध्ये घुसून बेदम मारहाण, २५ हजारांची रोकड लंपास !

जळगाव : प्रतिनिधी हॉटेल विक्रीच्या व्यवहारातून निर्माण झालेल्या वादाचा गंभीर परिणाम म्हणून के पी. प्राईड हॉटेलचे मालक खुबचंद प्रेमचंद साहित्या (६०, रा. मोहाडी रोड) यांना चार अनोळखी इसमांनी रुममध्ये घुसून बेदम मारहाण केली. बेल्टने तसेच लाथाबुक्क्यांनी झालेल्या मारहाणीत ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्या पाकिटातील २० ते २५ हजारांची रोकड जबरीने काढून आरोपी पसार झाले. […]

जळगावात चार शाळांना टार्गेट करत लाखोंची रोकड लांबविली : चोरीत तरुणीचा सहभाग !

जळगाव : प्रतिनिधी सावखेडा शिवारातील एकूण चार शाळांना टार्गेट करून, चोरट्यांनी १ लाख ९४ हजार रुपयांची रोकड लांबवली आहे. २५ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री चोरी झाली असून, या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, ही घटना सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाली असून या चोरीत तरुण मुलींचा सहभाग दिसून येत आहे. सविस्तर वृत्त असे […]

दरोडा टाकण्यासाठी सज्ज असलेली टोळीतील तिघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या !

भुसावळ : प्रतिनिधी बाजारपेठ पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने पथकाने निवडणूक पार्श्वभूमीवर शहरात गस्त घालत असताना २६ नोव्हेंबर रोजी रात्री काळा हनुमान मंदिरासमोरील भाजी मार्केट परिसरात दरोडा टाकण्यासाठी एकत्र जमलेल्या आरोपी टोळीपैकी तिघांना रंगेहाथ पकडले. पथकाने मोठ्या प्रमाणात घातक हत्यारे, तीन विनानंबर मोटारसायकली, मोबाइल फोन व इतर साहित्य जप्त केले आहे. उर्वरित पाच जण अंधाराचा […]

error: Content is protected !!