एरंडोल : प्रतिनिधी
तालुक्यातील जवखेडा ते गालापूर रस्त्यावर झुडपांमध्ये सुरू असलेल्या पत्त्यांच्या अड्ड्यावर धाड टाकून १५ आरोपींना रक्कम व दुचाकींसह ताब्यात घेतले आहे.

आरोपींत सोनू भिल, श्रावण भिल, राहुल सोनवणे, प्रवीण सोनवणे, संतोष सोनवणे, सुनील ठाकरे, मांगीलाल चव्हाण रतन भिल अशोक पाटील सचिन पवार, कांतिलाल सोनवणे, उत्तम जेढे, समाधान पाटील, संभाजी पाटील, सुनील वाघ या १५ आरोपींना मंगळवारी ताब्यात घेण्यात आले. रुपये १ लाख २१ हजार ३९० एवढ्या रकमेचा पंचनामा करण्यात आला असून, याकामी सपोनि नीलेश राजपूत, नंदलाल परदेशी, प्रदीप पाटील, समाधान तोंडे, नीलेश गायकवाड, योगेश पाटील, कुणाल देवरे, दीपक देसले व लहू हटकर या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले



