Home » ताज्या » पोलिसांनी रोखला अल्पवयीन मुलीचा साखरपुडा !

पोलिसांनी रोखला अल्पवयीन मुलीचा साखरपुडा !

पारोळा : प्रतिनिधी

तालुक्यातील पिंपळकोठा येथील एका अल्पवयीन मुलीचा साखरपुडा होत असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी विनायक कोते यांना मिळाल्याने त्यांनी पारोळा पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुनील पवार व कर्मचारी यांच्यासह घटनास्थळी जाऊन साखरपुडा थांबवला.

पारोळा तालुक्यातील पिंपळकोठा गावात एका अल्पवयीन मुलीचा साखरपुडा दि. २ रोजी होत असल्याची खबर उपविभागीय पोलिस अधिकारी विनायक कोते यांना मिळाली. त्या अनुषंगाने त्यांनी पारोळाचे पोलिस निरीक्षक सुनील पवार यांच्यासोबत सहकारी पोकॉ. हितेश बेहरे, गणेश पाटील, चालक वेलचंद पवार, हवालदार सुनील हटकर, संजय पवार, संदीप सातपुते तसेच पिंपळकोठा गावचे पोलिस पाटील तापीराम पाटील, ग्रामसेविका योगिता पाटील यांना साखरपुड्याच्या ठिकाणी घेऊन जात मुलीच्या व मुलाच्या वडिलांना व त्यांच्या मामांना बालविवाह प्रतिबंध अधिनियम २००६ अन्वये ही बाब बेकायदेशीर असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिले व हा साखरपुडा रोखला.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *