जळगाव : प्रतिनिधी
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आ.चव्हाण यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलीस निरीक्षक पाटील यांच्यासह मणियार बंधू यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर पोलीस अधीक्षकांनी यावर तत्काळ कारवाई करीत पोलीस निरीक्षक पाटील यांना निलंबित केले आहे. तर त्या मणियार बंधूंची चौकशी करणार असल्याचे समजते. एकदा नाकारल्यानंतर देखील दुसरा प्रस्ताव तयार करुन दोघ भावंडांनी शस्त्रपरवाना मिळवला. त्यांकडे असलेल्या शस्त्र परवान्यावर आमदार मंगेश चव्हाण यांनी आक्षेप घेतला होता. त्यानंतर आयुष मणियार व पियुष मणियार या दोघं भावंडांचा शस्त्र परवाना रद्द करण्याविषयीचा प्रस्ताव पोलिस दलाने जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला आहे. त्यावर जिल्हाधिकारी काय भूमीका घेता याकडे लक्ष लागून आहे.

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदार मंगेश चव्हाण आयुष मणियार व पियुष मणियार या दोघं भावांना शस्त्र परवान्याची काय गरज? असा प्रश्न उपस्थित केला होता. त्यानंतर पोलिस दल खळबळून जागे झाल्यानंतर पोलीस दलाकडून शस्त्र परवान्यासंदर्भात माहिती घेण्यात आली. या शस्त्रपरवान्या संदर्भात एमआयडीसी पोलिस ठाण्याच्यावतीने अहवाल मागविण्यात आला. त्यानंतर दोघं भावंडांचा शस्त्र परवाना रद्द करण्यात यावा याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला आहे. अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिली. आमदार मंगेश चव्हाण यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत गंभीर आरोप केले होते. त्या आरोपांची चौकशी सुरु असून चौकशीसाठी आयुष मणियार याला चौकशीसाठी बोलविणार असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी दिली.



