महायुती सरकारने लाडक्या बहिणींना दिली आनंदाची बातमी !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत 21 ते 65 वयोगटातील महिलांना दरमहा 1500 रुपये देण्यात येतात. आत्तापर्यंत कोट्यावधी महिलांना 13 महिने पैसे मिळाले आहेत. मात्र ऑगस्ट महिन्याचा हप्ता अद्याप मिळाला नसल्याने महिला प्रतिक्षेत होत्या. अखेर महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेंनी याबाबत मोठी घोषणा केली आहे. ऑगस्टचा हप्ता पात्र […]
खळबळजनक : २३ वर्षीय विवाहितेने संपविली जीवनयात्रा !

जळगाव : प्रतिनिधी शहरातील सुंदरमोती नगरात राहणाऱ्या २३ वर्षीय मयुरी गौरव ठोसर या विवाहितेने कौटुंबिक छळ आणि मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना १० सप्टेंबर रोजी उघडकीस आली आहे. अवघ्या चार महिन्यांपूर्वीच विवाह झालेल्या मयुरीने राहत्या घरात गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं. या घटनेमुळे तिच्या माहेरच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आरोपींना अटक केल्याशिवाय […]
संत ज्ञानेश्वर विद्यालया मध्ये दिनेश देसाई सरांचे व्यक्तिमत्व विकासावर समुपदेशन !

जळगाव : प्रतिनिधी श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय मध्ये इयत्ता ८ वी ते १०वी च्या विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्व विकास ,अभ्यास कसा करावा ? कोणत्या वेळी करावा ? वेळेचे नियोजन कसे करावे . याच्या विषयी मार्गदर्शन दिनेश देसाई सरांनी केले. मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी देसले सरांचे वृक्ष देऊन आभार मानले. देसाई सरांचे शैक्षणिक मार्गदर्शन मौल्यवान […]
मणियार बंधूंचा शस्त्र परवाना रद्दचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे ; पोलीस चौकशीला बोलविणार !

जळगाव : प्रतिनिधी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आ.चव्हाण यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलीस निरीक्षक पाटील यांच्यासह मणियार बंधू यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर पोलीस अधीक्षकांनी यावर तत्काळ कारवाई करीत पोलीस निरीक्षक पाटील यांना निलंबित केले आहे. तर त्या मणियार बंधूंची चौकशी करणार असल्याचे समजते. एकदा नाकारल्यानंतर देखील दुसरा प्रस्ताव तयार करुन दोघ भावंडांनी […]
दहा हजारांची लाच घेतांना महसूल अधिकारी एसीबीच्या ताब्यात !

पाचोरा : प्रतिनिधी पोट खराब जमीन वहितीखाली लावणेकामी १५ हजार रुपयांची लाच मागून दहा हजारांची लाच स्वीकारताना पाचोरा प्रांताधिकारी कार्यालयातील सहाय्यक महसूल अधिकारी गणेश लोखंडे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी रंगेहात पकडले. ही कारवाई १० सप्टेंबर रोजी दुपारी सुमारे ४.१५ वाजता करण्यात आली. एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडलेल्या सहाय्यक महसूल अधिकारी गणेश बाबुराव लोखंडे (वय ३७), […]
पत्नी माहेरी, आईला फोन अन तरुणाने संपविले आयुष्य !

धरणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील पाळधी येथील सलून व्यावसायिक विजय रमेश तायडे (३२) या तरुणाने मंगळवारी मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास पंख्याला टॉवेल बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. मिळालेल्या माहितीनुसार, विजय येथील बसस्थानक परिसरात भावासोबत सलून व्यवसाय करत होता. त्याचे एलएलबी पर्यंत शिक्षण देखील पूर्ण झाले होते. मयत विजय हा पत्नी, मुलासह वेगळा राहत होता. कुटुंबीयांनी पोलिसांना […]
वाहून गेलेल्या ‘त्या’ दोघांपैकी एकाचा सापडला मृतदेह !

जळगाव : प्रतिनिधी गणपती विसर्जनासाठी गेलेला असताना गिरणा नदीत बुडालेल्या राहुल रतिलाल सोनार (३४, रा. वाघनगर) या तरुणाचा चार दिवसांनंतर, बुधवारी (१० सप्टेंबर) सावखेडा शिवारात मृतदेह आढळून आला. दुसरीकडे, भोकणी शिवारात बुडालेल्या गणेश गंगाधर कोळी (२५, रा. ममुराबाद, ता. जळगाव) याचा अद्यापही शोध लागलेला नाही. सविस्तर वृत्त असे कि, शनिवारी (६ सप्टेंबर) गणेश विसर्जनासाठी गेल्यानंतर […]
भरधाव चारचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी !

भुसावळ : प्रतिनिधी शहरातील खडका चौफुलीजवळ झालेल्या अपघातात जळगाव येथील ५० वर्षीय रवींद्र बबन कोळी गंभीर जखमी झालेत. तर त्यांच्या सोबत असलेले शुभम सांगळे हे किरकोळ जखमी झाले. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलिसांत ८ सप्टेंबर रोजी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ४ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास शुभम सांगळे व […]
दीपनगरात सुपरवायझरसह तिघांना जबर मारहाण

भुसावळ : प्रतिनिधी शहराजवळील दीपनगर येथे राखेचे कंत्राट का घेतले, याचा जाब विचारत सुपरवायझरसह तिघांना मारहाण करण्यात आली आणि पाच हजार दोनशे रुपये लुटले. ही घटना ७ रोजी दीपनगर प्रकल्पाच्या गेटसमोर दुपारी पाच वाजता घडली. या प्रकरणी निंभोऱ्याच्या तिघांविरोधात भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, शेख अशफाक शेख सगीर (३३, रा.ग्रीन पार्क, […]
पूर्ण होत आलेल्या कामात अचानक अडथळा येणार !

आजचे राशिभविष्य दि.११ सप्टेंबर २०२५ मेष राशी आज कामाच्या ठिकाणी खूप धावपळ होईल. पूर्ण होत आलेल्या कामात अचानक अडथळा येऊ शकतो. व्यवसायात एखाद्या अनोळखी व्यक्तीवर जास्त विश्वास ठेवू नका. अन्यथा तुमची फसवणूक होऊ शकते. नोकरीत तुमच्या आणि तुमच्या वरिष्ठांमध्ये मतभेद होऊ शकतात. वृषभ राशी आजचा दिवस सकारात्मक असेल. आधी अडकलेले काम पूर्ण होईल. काम अधूनमधून […]