Home » जळगाव » पिंप्राळ्यात देहविक्रीचा अड्डा उद्ध्वस्त; चार महिलांची सुटका

पिंप्राळ्यात देहविक्रीचा अड्डा उद्ध्वस्त; चार महिलांची सुटका

जळगाव : प्रतिनिधी

पिंप्राळ्यात बारीवाड्यातील एका घरावर डीवायएसपी यांच्या पथकाने सोमवारी सायंकाळी ५ वाजता छापा टाकून देहविक्रीचा अड्डा उद्ध्वस्त केला. यात पश्चिम बंगालच्या २८ वर्षीय तरुणीसह चार महिलांची सुटका केली. त्यांची आशादीप शासकीय वसतिगृहात रवानगी करण्यात आली. छाप्या दरम्यान एक ग्राहक पळून गेला.

मिळालेल्या माहितीनुसार,  रामानंदनगर पोलिसात पिटा कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याचे काम उशिरापर्यंत सुरु होते. देहविक्री व्यवसाय सुरु असल्याची माहिती डीवायएसपी नितीन गणापुरे यांना मिळाली. त्यावरुन बारीवाडालगत बैरागी नामक महिलेच्या घरात पोलिसांनी १५०० रुपये देऊन एका पंटरला ग्राहक म्हणून पाठवले. त्याला खात्री करून मोबाइलवर मिस कॉल देण्यास सांगण्यात आले. त्याप्रमाणे मिस कॉल येताच पथक घरात शिरले असता देहविक्रीचा व्यवसाय चालवणाऱ्या महिलेसह व चार महिला आढळल्या. छापा टाकत असताना घराला असलेल्या तीन दरवाजांचा फायदा घेऊन एक ग्राहक पळून गेला. पोलिसांनी या ठिकाणाहून पश्चिम बंगालची २८ वर्षीय तरुणी, सुरत येथील ३० वर्षीय महिला व जळगावातील ३५ वर्षीय दोन महिलांची सुटका केली.

एका समाजाच्या पंचमंडळाच्या जागेलगत इतर घरापासून वेगळा व दोन बाजूने रस्ते असलेल्या घरात हा देहविक्रीचा अड्डा सुरु होता. त्याचा नागरिकांना त्रास होता. परंतु कुटुंब गुन्हेगारी प्रवृत्तीचे असल्याने कोणी विरोध करत नव्हते. मात्र, अनेकांनी पोलिसांकडे फोन करुन तक्रार केली होती. अड्डा चालवणाऱ्या महिलेचा भाऊ दयाराम बैरागी गुन्हेगार आहे. त्याच्याकडून २५ चोरीच्या दुचाकी पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *