दिवसा चोरी झालेल्या मोटरसायकली उघड; एक अटक, दोन दुचाकी जप्त

चाळीसगाव : प्रतिनिधी जिल्हा पोलीस अधिक्षक मा. डॉ. श्री. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधिक्षक चाळीसगाव मा. श्रीमती कविता नेरकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी चाळीसगाव उपविभाग मा. श्री विजयकुमार ठाकुरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली मेहुणबारे पोलिसांनी मोटरसायकल चोरीचा गुन्हा उघडकीस आणत सराईत चोरास अटक केली आहे. दिनांक ८ जानेवारी २०२६ रोजी मेहुणबारे पोलीस स्टेशन हद्दीतील दरेगाव व वरखेड […]
भाजपचे दावे फोल; चंद्रपुरात काँग्रेसचा महापौर ठरणार – वडेट्टीवारांचा घणाघात

नागपूर : प्रतिनिधी चंद्रपूर महानगरपालिकेत काँग्रेसची सत्ता येणार असून त्यासाठी आवश्यक संख्याबळ जमवण्यात यश आले आहे, असे स्पष्ट प्रतिपादन काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केले. काँग्रेसचे नगरसेवक भाजपच्या संपर्कात असल्याचा भाजप नेत्यांचा दावा म्हणजे केवळ “हवेतील पतंगबाजी” असल्याचा टोला वडेट्टीवार यांनी लगावला. काँग्रेस पक्षाचा नेता म्हणून चंद्रपुरात काँग्रेसची सत्ता स्थापन करणे आणि काँग्रेसचा […]
भुसावळात धडक कारवाई; इराणी टोळीच्या मुसक्या आवळल्या

जळगाव : प्रतिनिधी मध्यप्रदेशातील गुन्ह्यातील एका आरोपीला अटक करण्यासाठी आलेल्या पोलीस पथकावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या आणि जळगाव जिल्ह्यासह इतर राज्यांत चेन स्नॅचिंगचा धुमाकूळ घालणाऱ्या ‘इराणी टोळी’वर जळगाव पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. भुसावळ शहरातील मुस्लिम कॉलनी परिसरात राबविण्यात आलेल्या व्यापक कोंबिंग ऑपरेशनमध्ये पोलिसांनी तब्बल ४० लाख २५ हजार रुपये किमतीचे सोने, एक गावठी पिस्तूल, जिवंत […]
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नवीन; झेड-श्रेणी सुरक्षेसह सूत्रे हाती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था नितीन नवीन हे भारतीय जनता पक्षाचे १२ वे राष्ट्रीय अध्यक्ष बनले आहेत. आज दिल्लीतील भाजप मुख्यालयात झालेल्या समारंभात त्यांच्या नावाची औपचारिक घोषणा करण्यात आली. तसेच त्यांना औपचारिकरित्या या पदाची जबाबदारी सोपवण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि जेपी नड्डा यांच्यासह भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री, […]
कॉम्रेड पानसरे हत्या प्रकरणाला मोठा धक्का; समीर गायकवाडचा हृदयविकाराने मृत्यू

सांगली : वृत्तसंस्था कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी समीर गायकवाड याचा आज सांगलीत मृत्यू झाला. हृदयविकाराचा तीव्र झटका हे मृत्यूचे कारण असल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे. त्याच्यावर सांगलीतील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. मिळालेल्या माहितीनुसार, समीर गायकवाड याची प्रकृती अचानक बिघडल्याने त्याला तातडीने सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारांना […]
पिंप्राळ्यात देहविक्रीचा अड्डा उद्ध्वस्त; चार महिलांची सुटका

जळगाव : प्रतिनिधी पिंप्राळ्यात बारीवाड्यातील एका घरावर डीवायएसपी यांच्या पथकाने सोमवारी सायंकाळी ५ वाजता छापा टाकून देहविक्रीचा अड्डा उद्ध्वस्त केला. यात पश्चिम बंगालच्या २८ वर्षीय तरुणीसह चार महिलांची सुटका केली. त्यांची आशादीप शासकीय वसतिगृहात रवानगी करण्यात आली. छाप्या दरम्यान एक ग्राहक पळून गेला. मिळालेल्या माहितीनुसार, रामानंदनगर पोलिसात पिटा कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याचे काम उशिरापर्यंत सुरु होते. […]
चाळीसगावमध्ये हृदयद्रावक घटना; १३ वर्षीय विद्यार्थिनीचा बळी

चाळीसगाव : प्रतिनिधी येथील बसस्थानकात एस.टी. महामंडळाच्या बसच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या १३ वर्षीय विद्यार्थिनीचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे चाळीसगाव तालुक्यातील वडगाव लांबे परिसरात शोककळा पसरली आहे. वडगाव लांबे येथील आठवीत शिक्षण घेणारी माधुरी शिवाजी मोरे (वय १३) ही विद्यार्थिनी १७ जानेवारी रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास चाळीसगाव बसस्थानक परिसरात उभी होती. […]
निंबाच्या झाडावरून वाद, महिलेवर दांड्याने हल्ला व विनयभंग

चाळीसगाव : प्रतिनिधी तालुक्यातील एका गावात शेताच्या बांधावर असलेले निंबाचे झाड तोडल्याच्या कारणावरून एका महिलेचा विनयभंग करून मारहाण व अश्लील शिवीगाळ केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात दोघा सख्या भावांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शेताच्या बांधावर असलेले निंबाचे झाड तोडल्याच्या संशयावरून आरोपी दोघे पीडित […]
जे परदेशी व्यापारात गुंतलेले आहेत किंवा परदेशी स्त्रोतांद्वारे काम करत आहेत. एकंदरीत, हा काळ तुमच्यासाठी भाग्यशाली आहे.

आजचे राशिभविष्य दि.२० जानेवारी २०२६ मेष : राशीच्या लोकांना पैसे जमा करण्यात काही अडथळ्यांचा सामना करावा लागू शकतो. तुमची आर्थिक स्थिती काही प्रमाणात कमकुवत राहू शकते. तथापि, मित्रांच्या मदतीने समस्या सोडवता येतील. वृषभ : राशीच्या लोकांसाठी, भाऊ, बहिणी आणि मित्रांशी संबंधित बाबी काहीशा कमकुवत राहतील. तुमच्या राहणीमानातही बदल करावेसे वाटेल. आरोग्याच्या दृष्टीने महिना त्रासदायक राहील. […]