Home » जळगाव » घराच्या दुसऱ्या मजल्यावर सुरु असलेला जुगार अड्ड्यावर छापा !

घराच्या दुसऱ्या मजल्यावर सुरु असलेला जुगार अड्ड्यावर छापा !

जळगाव : प्रतिनिधी

स्थानिक गुन्हे शाखेने पाळधी येथे सुरू असलेल्या एका अवैध जुगार अड्ड्यावर छापा टाकून १६ जणांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईत पोलिसांनी जुगार खेळणाऱ्यांकडून रोकड आणि मोबाइल फोनसह एकूण १२ लाख २४ हजार २६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवार ८ सप्टेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेला पाळधीतील श्याम कॉलनी येथील एका घरात जुगार अड्डा सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे, पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या आदेशानुसार उपनिरीक्षक शरद बागल यांच्या नेतृत्वाखालील पथकाने या अड्ड्यावर छापा टाकला. पोलिसांनी घराच्या दुसऱ्या मजल्यावर सुरू असलेल्या जुगार अड्ड्यातून १६ जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ७लाख २२ हजार २६० रुपयांची रोकड आणि ५ लाख २ हजार रुपये किमतीचे विविध कंपन्यांचे मोबाइल फोन जप्त केले. हा सर्व मुद्देमाल जप्त करून संशयितांविरुद्ध धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कारवाईमध्ये उपनिरीक्षक शरद बागल यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस हवालदार अक्रम शेख, प्रवीण भालेराव, मुरलीधर धनगर, नितीन बाविस्कर, सलीम तडवी, विनोद पाटील, विजय पाटील, पोलिस कॉन्स्टेबल रवींद्र चौधरी, रवींद्र कापडणे, सिद्धेश्वर डापकर, राहुल रगडे, रतन गिते, मयूर निकम, चालक पोलिस हवालदार भारत पाटील, चालक पोलिस कॉन्स्टेबल महेश सोमवंशी, चालक पोलिस कॉन्स्टेबल प्रमोद ठाकूर आणि पाळधी दूरक्षेत्राचे सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत कंडारे व त्यांचे सहकारी यांनी सहभाग घेतला

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *