Home » जळगाव » एटीएम मदतीच्या बहाण्याने सेवानिवृत्त पोलिसांची फसवणूक

एटीएम मदतीच्या बहाण्याने सेवानिवृत्त पोलिसांची फसवणूक

जळगाव : प्रतिनिधी 

किराणा सामान खरेदी करण्यासाठी एटीएममधून पैसे काढण्यास गेलेल्या सेवानिवृत्त पोलिस कर्मचाऱ्याची कार्ड अदलाबदल करून २५ हजार ७०० रुपयांची फसवणूक झाल्याची घटना शहरातील स्टेट बँकेच्या मुख्य शाखेतील एटीएममध्ये घडली. या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे की , चंदूआण्णा नगर येथे राहणारे रमेश हरचंद मोरे (वय ६६) हे सेवानिवृत्त पोलिस अंमलदार आहेत. दि. २९ रोजी सकाळी सव्वा अकराच्या सुमारास ते दैनंदिन किराणा खरेदीसाठी शहरात आले होते. त्यावेळी त्यांनी मुख्य शाखेच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी प्रवेश केला. मशीनने पैसे न दिल्याने त्यांच्या मागे उभ्या असलेल्या एका अनोळखी व्यक्तीने ‘मदत’ करण्याच्या बहाण्याने मोरे यांना पिन टाकण्यास सांगितले. मोरे यांनी पिन टाकल्यानंतरही पैसे न निघाल्याने त्या व्यक्तीने एटीएम कार्ड ‘परत’ दिले आणि तेथून पसार झाला. काही वेळातच मोरे यांना त्यांच्या खात्यातून २५,७०० रुपये काढल्याचा एसएमएस आला. त्यावरून कार्ड अदलाबदल झाल्याची खात्री झाल्यानंतर मोरे यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. पोलीस अधिक तपास करीत आहेत.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *