अजित पवारांना मोठा धक्का : दिग्गज महिला नेत्याने दिला राजीनामा !

पुणे : वृत्तसंस्था स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसला (अजित पवार गट) मोठा धक्का बसला आहे. पुण्यातील प्रभावशाली महिला नेत्या तथा शहर कार्याध्यक्ष रुपाली ठोंबरे पाटील यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. दोन दिवसांपूर्वी दिलेला हा राजीनामा अद्याप पक्षाकडून मंजूर झालेला नाही, पण त्यामुळे अजित पवार गटात मोठी खळबळ उडाली आहे. […]
“टक्कल पडलं तरी मला शिकवतात : अजित पवारांची मिश्किल सभा गाजली”

पुणे : वृत्तसंस्था राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस असल्याने सर्वत्र प्रचारसभांची मालिका रंगली. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) प्रमुख अजित पवार यांनी सोमवारी खेड तालुक्यातील राजगुरूनगर येथे सभा घेतली. या सभेत त्यांनी आपल्या खास मिश्किल शैलीत “माझे टक्कल पडलं तरी लोक मलाच शिकवतात” अशी कोटी करून उपस्थितांमध्ये […]
“लग्नसमारंभात ७ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांनी आरोपीला रंगेहाथ पकडले”

कोल्हापूर : वृत्तसंस्था कोल्हापूर जिल्ह्यात लग्नसमारंभातून अवघ्या सात वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचाराचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित मुलगी आईसोबत नातेवाईकांच्या लग्नाला आली असताना 28 वर्षीय विकास कांबळे या युवकाने तिच्यावर अत्याचाराचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली. मुलीच्या वेळीच दिलेल्या आरडाओरड्याने आणि उपस्थित नागरिकांनी तत्काळ धाव घेतल्याने मोठा अनर्थ टळला. कात्यायनी–गिरगाव मार्गावर काही लोकांसोबत […]
कोर्टात एक जण गेला म्हणून निवडणुका थांबवायच्या? ; मुख्यमंत्री फडणवीस !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील अनेक ठिकाणी सुरु असलेल्या निवडणुका लांबणीवर टाकण्यात आल्याची घोषणा झाली असून आता यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी भाष्य केले आहे. राज्यातील निडवणूक आयोगाचा निवडणुका लांबणीवर टाकण्याचा निर्णय अतिशय चुकीचा असल्याचा संताप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी सकाळी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. निवडणूक आयोगाने कायद्याचा चुकीचा अर्थ लावला. आयोग कोणता कायदा काढतंय किंवा […]
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार? ‘या’ दिवशी होणार मोठी घोषणा !

पुणे : वृत्तसंस्था राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी जवळपास निश्चित झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवारांच्या वाढदिवसाचे (दि. 12) औचित्य साधून या आघाडीची घोषणा होण्याची शक्यता असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास राज्याच्या राजकारणात पुन्हा नवी राजकीय समीकरणे उदयास येणार आहेत. केंद्रात आणि राज्यात महायुतीत एकत्र असलेले […]
महामार्गावर भीषण अपघात; आमदारांच्या मर्सिडीजखाली 4 वर्षांची मुलगी गंभीर !

पुणे : वृत्तसंस्था स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा प्रचार वेग घेत असताना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या कारने 4 वर्षीय बालिकेला उडवल्याची धक्कादायक घटना रविवारी बोऱ्हाडेमळा येथे घडली. या अपघातात शुभ्रा पंढरीनाथ बोऱ्हाडे (वय 4) ही गंभीर जखमी झाली असून तिच्यावर पुण्यात उपचार सुरू आहेत. घटना रविवारी दुपारी पुणे–अहिल्यानगर महामार्गावरील बोऱ्हाडेमळा येथील ह्युंदाई शोरूमसमोर घडली. आमदार ज्ञानेश्वर कटके […]
बंद घराचा दरवाजा तोडून घरफोडी ; पिंप्राळ्यात घडली घटना !

जळगाव : प्रतिनिधी मुलीकडे गेलेल्या ६५ वर्षीय महिलेच्या बंद घराचा दरवाजा तोडून चोरट्यांनी घरफोडी करत ६३ हजार रुपये किमतीचे सोने-चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना पिंप्राळा परिसरातील सुतारवाडा येथे उघडकीस आली. या प्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहिती नुसार, सुतारवाडा, पिंप्राळा येथे राहणाऱ्या प्रमिलाबाई साहेबराव चौधरी या दि. […]
एटीएम मदतीच्या बहाण्याने सेवानिवृत्त पोलिसांची फसवणूक

जळगाव : प्रतिनिधी किराणा सामान खरेदी करण्यासाठी एटीएममधून पैसे काढण्यास गेलेल्या सेवानिवृत्त पोलिस कर्मचाऱ्याची कार्ड अदलाबदल करून २५ हजार ७०० रुपयांची फसवणूक झाल्याची घटना शहरातील स्टेट बँकेच्या मुख्य शाखेतील एटीएममध्ये घडली. या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे की , चंदूआण्णा नगर येथे राहणारे रमेश हरचंद मोरे (वय […]
घरी कुणीही नसताना वृद्धाने घेतला टोकाचा निर्णय !

जळगाव : प्रतिनिधी घरी कोणीही नसतांना सुभाष मोतीराम पाटील (वय ५३, रा. नवनाथ नगर, हरिविठ्ठल नगर) यांनी गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना रविवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहिती नुसार, शहरातील हरिविठ्ठल नगरात सुभाष पाटील हे पत्नी व तीन मुलांसह वास्तव्यास आहे. […]
कामाच्या गडबडीत आरोग्याकडे लक्ष द्या. बाहेरचे खाणे पचनक्रिया बिघडवू शकते.

आजचे राशिभविष्य दि.१ डिसेंबर २०२५ मेष राशी मेष राशीसाठी आजचा दिवस चढ-उतारांनी भरलेला असेल. कामाच्या गडबडीत आरोग्याकडे लक्ष द्या. बाहेरचे खाणे पचनक्रिया बिघडवू शकते. व्यावसायिक प्रतिस्पर्धकांपासून सावध राहा. पाहुण्यांच्या आगमनाने कुटुंबातील वातावरण हलके होईल. लहान मुलांसोबत वेळ घालवल्याने आनंद मिळेल. वृषभ राशी वृषभ राशीच्या लोकांना सकाळी चांगली बातमी मिळाल्याने तुम्ही उत्साही राहाल. इतरांच्या नकारात्मक टिप्पण्यांमुळे […]