Home » जळगाव » दहा हजारांची लाच घेतांना महसूल अधिकारी एसीबीच्या ताब्यात !

दहा हजारांची लाच घेतांना महसूल अधिकारी एसीबीच्या ताब्यात !

पाचोरा : प्रतिनिधी

पोट खराब जमीन वहितीखाली लावणेकामी १५ हजार रुपयांची लाच मागून दहा हजारांची लाच स्वीकारताना पाचोरा प्रांताधिकारी कार्यालयातील सहाय्यक महसूल अधिकारी गणेश लोखंडे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी रंगेहात पकडले. ही कारवाई १० सप्टेंबर रोजी दुपारी सुमारे ४.१५ वाजता करण्यात आली.

एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडलेल्या सहाय्यक महसूल अधिकारी गणेश बाबुराव लोखंडे (वय ३७), असे लाच स्वीकारलेल्या व्यक्तीचे नाव आहे. लोखंडे हे पाचोरा येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात सहाय्यक महसूल अधिकारी पदावर कार्यरत आहेत. तक्रारदाराच्या पत्नीच्या नावे कोकडी (ता. पाचोरा) शिवारात पोट खराब क्षेत्र असून, ते त्यांनी मेहनत वहितीखाली आणले आहे. तसेच त्या क्षेत्रावर ते सध्या पीक लागवड करत आहे. परंतु, सदरचे क्षेत्र हे गाव नमुना नंबर ७/१२ मध्ये पोट खराब म्हणून दाखल असल्याने त्यांना नैसर्गिक आपत्तीची नुकसान भरपाई आणि शेती विषयक कर्ज मिळत नाही. म्हणून सदरचे पोट खराब क्षेत्र गाव नमुना नंबर ७/१२ वर वहितीखाली लावणेकामी तक्रारदार यांनी पत्नीचे नाव लावण्यासाठी पाचोरा उपविभागीय कार्यालयात अर्ज केला होता. अर्जात नमुद केलेले काम करून देण्यासाठी सदर कार्यालयातील सहाय्यक महसूल अधिकारी गणेश लोखंडे यांची भेट तक्रारदाराने घेतली

सदरची कारवाई जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा व तपास अधिकारी हेमंत नागरे, पोलीस शिपाई भूषण पाटील. राकेश दुसाने, अमोल सुर्यवंशी भारत तांगडे यांनी यशस्वी केली. दरम्यान, भ्रष्टाचारासंबंधी काह माहिती असल्यास किंवा कोणी लोक सेवकाने लाचेची मागणी केल्यास तातडीने संपर्क साधण्याचे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना केले आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *