Home » जळगाव » जामनेर-बोदवड रस्त्यावर रिक्षाचा अपघात : चालकावर गुन्हा दाखल !

जामनेर-बोदवड रस्त्यावर रिक्षाचा अपघात : चालकावर गुन्हा दाखल !

बोदवड : प्रतिनिधी

रिक्षा अपघातात तरुणाच्या मृत्यूप्रकरणी येथील पोलिसांत रिक्षाचालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे कि, जामनेर-बोदवड रस्त्यावर रिक्षाने (एम. एच.१९/ बी. यू. ४६०७) शिरसाळा मारोतीच्या दर्शनाला नाशिक सातपूर येथील मंगळकर कुटुंबीय जात असताना २१ रोजी दुपारी बारा वाजेच्या दरम्यान रिक्षाचालक दीपक भास्कर नेवल याने जय माँ वैष्णवी जिनिंगजवळ पुढे चालणाऱ्या चारचाकीला ओव्हरटेक करण्याच्या नादात रिक्षा पलटी झाली. त्यात एकाच कुटुंबातील सात जण गंभीर जखमी झाले होते. तर योगेश ज्ञानदेव मंगळकर याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

याबाबत मयत योगेश मंगळकर याचा लहान भाऊ वैभव ज्ञानदेव मंगळकर याने बोदवड पोलिसांत सदर अपघाताची फिर्याद दिल्यानंतर आरोपी रिक्षाचालक दीपक भास्कर नेवल (रा. नवी दाभाडी, ता. जामनेर) याच्या तर भारतीय न्याय संहिता १०६ (१), १२५ (अ) व (ब),२८१, मोटार वाहन अधिनियम १८४, प्रमाणे सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *