निधीवाटपाबाबत पुन्हा शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री नाराज ?

मुंबई : वृत्तसंस्था महायुती सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली काल २४ जून रोजी मंत्रालयात राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत राज्याच्या विकासाला चालना देणारे ८ मोठे निर्णय घेण्यात आले. मात्र, या बैठकीनंतर शिवसेनेच्या मंत्र्यांना निधी वाटपात सापत्न वागणूक दिली जात असल्याचे बोलले जात आहे. यामुळे शिवसेनेतील अनेक मंत्री नाराज असल्याची चर्चा होत […]
मोठी बातमी : सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी घसरण !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशभरात आज सोन्या – चांदीच्या दागिन्यांची खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. कारण आज सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. इराण आणि इस्रायलमधील युद्धबंदीमुळे पश्चिम आशियात शांततेची आशा असताना, २४ कॅरेट सोने ९९,२१० रुपये प्रति १० ग्रॅमवर व्यवहार करत आहे. एक दिवस आधी २४ जून रोजी त्याची किंमत […]
‘संविधान हत्या दिवस’ हास्यास्पद : वडेट्टीवारांची टीका !

नागपूर : वृत्तसंस्था देश स्वतंत्र होत असताना ज्यांनी स्वातंत्र्याला विरोध केला. इंग्रजांच्या विचारधारेच्या विरोधात सर्व देश उभा असताना ज्यांची विचारधारा इंग्रजांसोबत उभी होती. ज्यांनी 55 वर्षांपर्यंत तिरंगा फडकवला नाही. अशा लोकांनी लोकशाहीचे हत्या केली किंवा संविधानाची हत्या केली असे बोलणे, चुकीचा आहे. हे सर्व हास्यास्पद असल्याचे काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. या माध्यमातून […]
पाचोरा : वर्गखोलीत दोरीच्या सहाय्याने शिक्षकाने संपविले आयुष्य !

पाचोरा : प्रतिनिधी शहरातील एका शाळेत शिक्षकाने टोकाचे पाऊल उचलत गळफास घेत आत्महत्या केलीय. शाळेतील चौथ्या मजल्यावरील एका खोलीत आत्महत्या केल्याचे आज 25 जून रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास उघडकीस आले. दरम्यान, या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पुढील तपास पाचोरा पोलीस करत आहेत. सविस्तर वृत्त असे कि, पाचोरा तालुक्यातील दहिगाव संत येथील रविंद्र […]
पोलीस दल हादरले : पोटच्या मुलीचा खून करत पोलिस कर्मचाऱ्याने संपवलं जीवन !

नाशिक : वृत्तसंस्था आपल्या सहा वर्षाच्या चिमुकलीचा खून करून पोलिस कर्मचाऱ्याने स्वत:ही गळफास घेत जीवनयात्रा संपवल्याची खळबळजनक घटना नाशिकरोड पोलिस ठाणे हद्दीत घडली आहे. जीवनयात्रा संपवल्याचे कारण अद्याप समजू शकले नसले तरी, काही दिवसांपूर्वीच या पोलिस कर्मचाऱ्याने पत्नीसोबत घटस्फोट घेतला होता. उपनगर पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलिस अंमलदार स्वप्निल दीपक गायकवाड (३४, रा. जेलरोड) या […]
‘संविधान हत्या दिवसा’ला संजय राऊत यांचा विरोध !

मुंबई : वृत्तसंस्था देशात भाजपच्या वतीने इंदिरा गांधी यांनी लावलेल्या आणीबाणीला 50 वर्ष झाल्याच्या निमित्ताने ‘संविधान हत्या दिवस’ पाळण्यात येत आहे. याला उद्धव ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी विरोध दर्शवला आहे. इतकेच नाही तर त्यांनी इंदिरा गांधी यांनी लादलेल्या आणीबाणीचे समर्थन देखील केले आहे. गेल्या दहा वर्षांपासून देशात अघोषित आणीबाणी लागू असल्याचा आरोप […]
हॉटेलमधील मॅनेजरवर प्राणघातक हल्ला : गुंडांनी केली तोडफोड !
भुसावळ : प्रतिनिधी तालुक्यातील साकेगाव येथील वरुण हॉटेलमधील मॅनेजरवर प्राणघातक हल्ला करुन गुंडांनी तोडफोड व लुट केल्याची धक्कादायक घटना २३ जूनच्या रात्री घडली. या प्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वरुण हॉटेलचे मॅनेजर सुमित सुभाष इंगळे (वय ३३) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार कुणाल अहिरे याने २२ जून रोजी […]
जामनेर-बोदवड रस्त्यावर रिक्षाचा अपघात : चालकावर गुन्हा दाखल !

बोदवड : प्रतिनिधी रिक्षा अपघातात तरुणाच्या मृत्यूप्रकरणी येथील पोलिसांत रिक्षाचालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, जामनेर-बोदवड रस्त्यावर रिक्षाने (एम. एच.१९/ बी. यू. ४६०७) शिरसाळा मारोतीच्या दर्शनाला नाशिक सातपूर येथील मंगळकर कुटुंबीय जात असताना २१ रोजी दुपारी बारा वाजेच्या दरम्यान रिक्षाचालक दीपक भास्कर नेवल याने जय माँ वैष्णवी जिनिंगजवळ पुढे […]
अमळनेर आणि चोपडा तालुक्यातील दोघे सराईत गुन्हेगार हद्दपार

अमळनेर : प्रतिनिधी अमळनेर येथील मोज्जम शेख शब्बीर याला एक वर्ष आणि अडावद, ता. चोपडा येथील संजय रवींद्र इंगळे याला तीन महिन्यांसाठी हद्दपार करण्यात आले असल्याची प्रांताधिकारी माहिती नितीनकुमार मुंडावरे यांनी दिली. मिळालेल्या माहितीनुसार, अमळनेर शहरातील गांधलीपुरा भागातील दर्गाअली भागातील मोज्जम शेख शब्बीर याच्यावर चोरी, घरफोडी, मालमत्ता नुकसान, मारहाण यासारखे गुन्हे आहेत. पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम […]
पोलीस अधीक्षकांचे आदेश : १९ अधिकाऱ्यांच्या झाल्या बदल्या !

जळगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्हा पोलिस दलातील १९ अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या आहेत. यासंदर्भातील आदेश सोमवारी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी काढले असून, बदली झालेल्या अधिकाऱ्यांमध्ये ६ सहायक पोलिस निरीक्षक तर १३ पोलिस उपनिरीक्षकांचा समावेश आहे. या बदली प्रक्रियेत चार अधिकाऱ्यांच्या विनंती बदल्या झाल्या आहेत. बदली प्रक्रियेचे आदेश जारी झाल्यानंतर संबधित पोलिस […]