Home » जळगाव » वाळू माफियांची दादागिरी पुन्हा वाढली : महसूल पथकाशी घातला वाद !

वाळू माफियांची दादागिरी पुन्हा वाढली : महसूल पथकाशी घातला वाद !

जळगाव  : प्रतिनिधी

अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाहतूकदारांवर कारवाईसाठी गेलेल्या महसूल पथकाशी वाळू वाहतूकदारांनी वाद घालत जागेवर वाळू टाकून पळ काढला. ही घटना १२ जून रोजी बांभोरी गावाजवळील गिरणा नदी पात्रात घडली. या प्रकरणी धरणगाव पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बांभोरी गावाजवळील गिरणा नदी पात्रात अवैध वाळू उपसा सुरू असताना धरणगाव येथील महसूल पथक तेथे कारवाईसाठी पोहचले. पाच ट्रॅक्टरमधून अवैधरीत्या वाळूची वाहतूक केली जात होती. पथक कारवाई करू लागले त्यावेळी ट्रॅक्टरमालक आणि चालकांनी पथकाशी हुज्जत घातली व ट्रॅक्टरमधील वाळू जागेवरच टाकून ट्रॅक्टर व ट्रॉलीसह पसार झाले.

या प्रकरणी तलाठी मनोहर बाविस्कर (रा. खोटे नगर) यांनी धरणगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून ट्रॅक्टरमालक गंगाराम श्यामराव सोनवणे, दिनेश भागवत नन्नवरे, दीपक विजय सपकाळे, विशाल विजय सपकाळे आणि ऋषी उर्फ गड्डा साळुंखे (सर्व रा. बांभोरी, या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *