धक्कादायक : वीज पडून दोन सख्ख्या भावांसह एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू

छत्रपती संभाजी नगर : वृत्तसंस्था सिल्लोड तालुक्यात शनिवारी दि. १४ दुपारी विजेच्या कडकडाटासह झालेल्या मुसळधार पावसाने मोठे संकट ओढवले. वीज पडून दोन सख्ख्या भावांसह एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर चार जनावरेही दगावली. या घटनेने तालुक्यावर शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी 2 वाजेच्या सुमारास तालुक्यात विजांच्या प्रचंड कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. याच […]
बच्चू कडूंचे आंदोलन स्थगित ; सरकारने वचन पूर्ण न केल्यास मंत्रालयात घुसणार?

अमरावती : वृत्तसंस्था राज्यातील प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि माजी आमदार बच्चू कडू यांनी सात दिवसांपासून सुरू असलेले अन्नत्याग आंदोलन स्थगित केले आहे. शेतकरी कर्जमाफी, शेतमजूर, आणि दिव्यांगांच्या हक्कांसाठी सुरू असलेल्या या आंदोलनात 90% मागण्या सरकारने मान्य केल्याचे कडू यांनी जाहीर केले. तसेच, दिव्यांगांचे मानधन वाढवण्याचे आश्वासन मिळाले असून, सरकारने दिलेले वचन पूर्ण न केल्यास 2 […]
प्रहारच्या कार्यकर्त्यांचा अजित पवारांच्या कार्यक्रमात गोंधळ !

पुणे : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुणे दौऱ्यातील एका कार्यक्रमात प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शेतकरी कर्जमाफी आणि माजी आमदार बच्चू कडू यांच्या 14 मागण्यांसाठी जोरदार घोषणाबाजी करत गोंधळ घातला. बच्चू कडू यांच्या सात दिवसांपासून सुरू असलेल्या अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अमरावतीच्या शेतकऱ्यांनी, विशेषतः महिलांनी, आक्रमक पवित्रा घेतला. ‘बच्चू कडूंना न्याय द्या’ अशा […]
बच्चू कडूंची तब्येत खालावली : शेतकरी नेते राजू शेट्टींचा सरकारला सवाल !

अमरावती : वृत्तसंस्था राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी, दिव्यांगाना अनुदान मिळावे यांसह १७ मागण्या घेऊन प्रहारचे प्रमुख बच्चू कडू अमरावती येथील गुरुकुंज मोझरी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज समाधीस्थळी अन्नत्याग उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या या आंदोलनला काही संघटना आणि राजकीय पक्षांनी पाठिंबा दर्शविला आहे. अन्नत्याग आंदोलनामुळे बच्चू कडूंची तब्येत खालावली असून, त्यांना रक्ताच्या उलट्या झाल्या आहेत. मात्र, […]
चोरट्यांची दादागिरी वाढली : गाडीच्या डिक्कीतून २ लाख लंपास !

चाळीसगाव : प्रतिनिधी निवृत्त वृद्ध कर्मचाऱ्याने बँकेतून २ लाखांची रक्कम काढून ती दुचाकीच्या डिक्कीत ठेवली होती. तर रस्त्याने जातांना जांभूळ खरेदी केले व ते डिक्कीत ठेवण्यासाठी डिक्की उघडली असता त्यातील २ लाख रूपये चोरी झाल्याचा प्रकार शहरातील भडगाव रोडवरील अंधशाळेजवळ गुरुवारी दुपारी उघडकीस आला. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील संत रोहिदास सोसाटीत शिरीषकुमार भास्कर लिंडायत (वय ७२) […]
विजेचा जबर शॉक बसल्याने वडिलांसह मुलीचा दुर्देवी मृत्यू !

रावेर : प्रतिनिधी तालुक्यातील तासखेडा येथे दि.१३ रोजी सक ाळी घडलेल्या दुर्दैवी घटनेत विजेच्या धक्क्याने वडिलांसह मुलीचा मृत्यू झाल्याची घटना घडली. तर आजोबा ही जखमी झाले आहेत. शुक्रवारी सकाळी घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेत वडील समाधान अशोक कोळी (वय ३६) आणि त्यांची ११ वर्षांची कन्या मानवी कोळी […]
नफ्याचे आमिष दाखवित महिलेची ऑनलाइन फसवणूक !

जळगाव : प्रतिनिधी शेअर मार्केटमध्ये नफा झाल्याचे भासवून नंतर अधिकची गुंतवणूक करण्यास सांगत स्मिता अतुल महाजन (४३, रा. चहार्डी, ता. चोपडा) या महिलेची आठ लाख ९३ हजार रुपयांमध्ये फसवणूक करण्यात आली. हा प्रकार १७ ऑक्टोबर २०२४ ते ९ जून २०२५ दरम्यान घडला. या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात अनोळखींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, […]
वाळू माफियांची दादागिरी पुन्हा वाढली : महसूल पथकाशी घातला वाद !

जळगाव : प्रतिनिधी अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाहतूकदारांवर कारवाईसाठी गेलेल्या महसूल पथकाशी वाळू वाहतूकदारांनी वाद घालत जागेवर वाळू टाकून पळ काढला. ही घटना १२ जून रोजी बांभोरी गावाजवळील गिरणा नदी पात्रात घडली. या प्रकरणी धरणगाव पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बांभोरी गावाजवळील गिरणा नदी पात्रात अवैध वाळू उपसा सुरू […]
दोन दुचाकीची जबर धडक : वृद्धाचा दुर्देवी मृत्यू !

जळगाव : प्रतिनिधी जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना घडत असतांना नुकतेच वरणगाव शहरातील येथील छत्रपती शिवाजीनगर व रेणुकानगरला जोडणाऱ्या जुन्या महामार्गावरील पुलावर गुरुवारी रात्री १० वाजेच्या सुमारास दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात अयुब खान रशीद खान (वय ६५) यांचा मृत्यू झाला. पाचजण गंभीर जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, देवा संतोष गुमळकर (रा. वरणगाव, ता. […]
गुंतवणुकीच्या बाबतीत या राशीतील लोकांना होणार नफा !

मेष : प्रत्येक कामात सकारात्मक परिणाम मिळतील आणि नशीबही साथ देईल. भागीदारी आणि सहकार्याचे काम चांगले कराल, नोकरीत केलेले काम फलदायी ठरेल. कुटुंबातील सदस्य साथ देतील आणि काही मोठे काम पूर्ण झाल्याने फायदा होईल. वृषभ: नशीब साथ देईल आणि काही उपयुक्त गोष्टी कळू शकतात. नवीन माहिती आणि संदेश तुमच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यास मदत करतील. जास्त […]