Home » जळगाव » महसूल अधिकाऱ्यांच्या व कर्मचाऱ्यांच्या संगनमताने होते वाळू चोरी !

महसूल अधिकाऱ्यांच्या व कर्मचाऱ्यांच्या संगनमताने होते वाळू चोरी !

जळगाव : प्रतिनिधी           भाग – ३ 

जळगाव शहरातील अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात बांधकामाचे काम सुरू आहे या ठिकाणी शेकडो ब्रास अवैध वाळू मोठ्या प्रमाणात बांधकामासाठी टाकण्यात आलेली आहे. हे सर्व जळगाव शहरातील महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांना माहीत असल्यावर देखील या ठिकाणी कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही तर जळगाव शहरानजीक सुरू असलेल्या वाळू उत्खननामध्ये महसूल अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांच्याच संगणमताने वाळू चोरी होत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये दबक्या आवाजात सुरू आहे.

जळगाव शहरानजीक असलेल्या गिरणा नदी पात्रातून अनेक वाळू चोर दिवस-रात्र वाळू चोरी करत असतात मात्र याची माहिती जळगाव महसूल विभागाला नसते का असे नाही महसूल विभागाला प्रत्येक माहिती असते मात्र याकडे अधिकारी व कर्मचारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून या वाळू चोरीत त्यांची देखील संगणमत असल्याचे चित्र सध्या जळगाव शहरात निर्माण झाले आहे. अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांसोबत दिवस-रात्र वाळू चोरांचे एक दोन कार्यकर्ते सोबत असल्याचे शासकीय कार्यालयात नेहमीच दिसून येते. मात्र यांच्याबाबत तक्रार करणार कोण व त्यावर महसूल अधिकारी जबाबदारीने उत्तर तरी देतात का बे जबाबदार झालेले महसूल अधिकारी जळगाव जिल्हा वाळू चोरीतून मुक्त करणार का,  कि गिरणामाईचे अशाच प्रमाणे वस्त्रहरण होत राहणार.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *