Home » महाराष्ट्र » संजय राऊतांचा अजित पवारांवर हल्लाबोल : साखर कारखान्यासाठी 500 कोटी?

संजय राऊतांचा अजित पवारांवर हल्लाबोल : साखर कारखान्यासाठी 500 कोटी?

मुंबई : वृत्तसंस्था

महायुती सरकारवर महाविकास आघाडीचे नेते आरोप करीत असतांना आता सरकारला शेतकऱ्यांची कर्जमाफी करता येत नाही. लाडक्या बहीणींना तुम्हाला नीट पैसे देता येत नाही, पण मला माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा चेअरमन करा, मी 500 कोटी 24 तासांमध्ये घेऊन येतो हे राज्याचे अर्थमंत्री सांगत आहे, असे म्हणत ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी महायुतीवर निशाणा साधला आहे.

संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार हे राष्ट्रीय नेते आहेत आणि अजून गावातूनच फिरत आहे. हे ह्या राज्याचे दुर्दैव आहेकी असे नेते या राज्याला मिळाले, असा टोलाही राऊतांनी लगावला आहे. 500 कोटी हा काही लहान आकडा नाही, तुम्ही कुणाच्या तिजोरीतील पैसे लुटणार आहात? असा सवाल राऊतांनी केली आहे.

अजित पवारांकडे राज्यातील इतर कोणत्याही कामाला द्यायला पैसे नाही. ठणठण गोपाळा, पण माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा जर मी चेअरमन झालो तर 24 तासांमध्ये 500 कोटी रुपये सरकारकडून घेऊन येईल, असे अजित पवार म्हणाले आहेत, असा म्हणत ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी महायुतीवर टीकास्त्र डागले आहे.

संजय राऊत म्हणाले की, भास्कर जाधव यांचे वक्तव्य मी काही ऐकले नाही. मन मोकळे करायचे असेल तर पक्षाच्या व्यासपीठावर करायला काहीच हरकत नाही. ते आमचे मित्र आणि जवळचे सहकारी आहेत. वर्धापन दिनानिमित्त ज्या मोजक्या लोकांनी पक्षाच्या मंचावर भाषण केलेल त्यातील एक भास्कर जाधव हे देखील होते. त्यांना जे म्हणायचे आहे ते अगदी ठामपणे पक्षामध्ये ते आपली भूमिका मांडत असतात. यापुढेही मांडतील, त्यांनी त्यांच्या भावना मांडल्या असतील तर पक्षप्रमुख त्यांची दखल घेतील.

 

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *