Home » महाराष्ट्र » संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल : फडणवीस यांचे राजकीय ज्ञान अघातच !

संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल : फडणवीस यांचे राजकीय ज्ञान अघातच !

मुंबई : वृत्तसंस्था

राज्याच्या राजकारणात राज ठाकरे आणि मनसेच्या युती वर मनात शंका का? असा प्रतिप्रश्न उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील टीका केली. देवेंद्र फडणवीस यांचे राजकीय ज्ञान अघातच आहे, असा खोचक टोला त्यांनी लगावला. इतकेच नाही तर ‘जे मिळाले ते सांभाळा’ असे म्हणत संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना सल्ला देखील दिला.

पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, श्रीकृष्णाने भगवद्गीता लिहिली, तो एक महान ग्रंथ आहे. त्यानंतर देवेंद्र फडणवीस आता नवीन ग्रंथ लिहिणार आहेत. त्यांचे राजकीय ज्ञान आघातच आहे. त्यांचे राजकारण आम्ही बघतोच आहोत. त्यांच्या आधीपासून आम्ही राजकारणात आहोत. त्यांच्या मेहेरबानीने आम्ही मुख्यमंत्री झालेलो नाही. मुख्यमंत्री होणे म्हणजे राजकारण करणे, असे होत नसते. ईडी, पोलिस, सीबीआय हातात असणे म्हणजे तुम्ही सर्वेसर्वा आहात, असे होत नाही. आपल्याला जे मिळाला आहे, ते सामान सांभाळा, असा सल्ला संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे.

महाराष्ट्राची निवडणूक अमित शहा यांची स्वतःची निवडणूक किंवा प्रत्यक्ष मोदींची निवडणूक आहे, अशा पद्धतीने लढले. वाराणसी लोकसभा निवडणुकीत सुरुवातीचे दोन तास नरेंद्र मोदी हे पिछाडीवर होते. आणि त्यानंतर मतमोजणी थांबवण्यात आली. त्यादरम्यान मतमोजणी केंद्रावरील इलेक्ट्रिसिटी बंद करण्यात आली. त्यावेळी ईव्हीएममधील डाटा उडवला गेला. नवीन मशीन आणल्या गेल्या. वाराणसी मध्ये मोदींचा पराभव झाला होता. त्यानंतर दोन तास गोंधळ घालण्यात आला. तसाच प्रकार महाराष्ट्रात झाला असल्याचा आरोपही संजय राऊत यांनी केला आहे.

महाराष्ट्रात निवडणुकीमध्ये विजय खेचून आणला नाही तर चोरण्यात आणला असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. निवडणूक आयुक्त, निवडणुकीतील प्रणाली ताब्यात घेण्यात आली होती. ज्या पद्धतीने निवडणुका झाल्या, ईव्हीएम मशीनचा वापर झाला, शेवटच्या दोन तासात 65 लाख मतदान अचानक वाढवण्यात आले, हे सर्व सेटिंग ज्या पद्धतीने करण्यात आले तेच राहुल गांधी यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर नेले असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. हिंदुस्तानची लोकशाही किती खतरनाक वळणावर आहे, हे त्यामुळे जगाला कळले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे जगात देशाला अपमान सहन करावा लागत आहे. ते लोकशाही नाही तर हुकूमशाही पद्धतीने काम करतात. अख्या जगात देशाची बदनामी झाली आहे. त्यामुळे देशाची प्रतिष्ठा धुळीला मिळाली असल्यास संजय राऊत यांनी म्हटले आहे.

 

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *