Home » जळगाव » संत ज्ञानेश्वर विद्यालय मध्ये दप्तर मुक्त आनंददायी शनिवार उपक्रम सुरू !

संत ज्ञानेश्वर विद्यालय मध्ये दप्तर मुक्त आनंददायी शनिवार उपक्रम सुरू !

जळगाव : प्रतिनिधी

श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये त्यांच्या वर्तन व जबाबदारीबाबत जागरूकता निर्माण व्हावी, चांगल्या सवयी, सहकार्यवृत्ती, नेतृत्व गुणांचा विकास व्हावा या हेतूने पहिली ते इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी महिन्यातील प्रत्येक दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी ‘आनंददायी शनिवार’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

तर्कसंगत विचार आणि कार्य करण्यासाठी सक्षम असणाऱ्या तसेच करुणा, सहानुभूती, साहस, लवचिकता, वैज्ञानिक चिंतन, रचनात्मक कल्पनाशक्ती, नैतिक मूल्य असणाऱ्या उत्तम मनुष्यत्वाचा विकास हा नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा महत्त्वाचा उद्देश आहे. सध्याच्या काळात लहान वयातही विद्यार्थ्यांना ताण तणाव, उदासिनता, नैराश्य या मानसिक विकारांना सामोरे जावे लागत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर शालेय जीवनात ‘आनंददायी शनिवार’ हा उपक्रम राबविल्यास विद्यार्थ्यांची शिक्षणाची अभिरुची वाढीस लागेल. त्याचा निश्चितच विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर चांगला परिणाम होईल. विद्यार्थ्यांची गळती व अनुत्तीर्ण होण्याचे प्रमाण कमी होईल, तसेच विद्यार्थ्यांचे मानसिक स्वास्थ्य जपले जाऊन त्यांचे उत्तम अध्ययन होईल, असा विश्वास मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी व्यक्त केला आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *