September 29, 2026 9:54 am

लाईव्ह न्यूज :
लाईव्ह न्यूज :

बिहारमध्ये पहिल्यांदा झाले मोबाईल फोनद्वारे ई-मतदान !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील बिहार पहिले राज्य बनले आहे, जिथे मोबाईल फोनद्वारे ई-मतदान केले जाईल. ही प्रणाली शनिवार, २८ जून रोजी होणाऱ्या महानगरपालिका सर्वसाधारण आणि पोटनिवडणुक २०२५ मध्ये लागू केली जाईल. त्यामुळे मतदान प्रक्रिया अधिक स्मार्ट, सुरक्षित आणि सुलभ होईल. ५१,१५७ मतदारांचे ई-मतदानाद्वारे मतदान बिहार राज्य निवडणूक आयोगाच्या मते, यावेळी निवडणूक प्रक्रियेत नावीन्य आणून […]

नशिराबाद येथील के.एस.टी. उर्दू शाळेचा प्रशासनाने पोलिस संरक्षणात घेतला ताबा

मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या संवेदनशीलतेमुळे 80 विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात जाण्यापासून वाचले जळगांव : प्रतिनिधी तालुक्यातील नशिराबाद येथील के.एस.टी. उर्दू माध्यमिक शाळेतील 10वी उत्तीर्ण 80 विद्यार्थ्यांना अकरावीच्या प्रवेशासाठी आवश्यक असलेले शाळा सोडल्याचे दाखले मिळत नव्हते. यामुळे विद्यार्थी व पालक मोठ्या समस्येत सापडले होते. संबंधित शाळेचे माजी प्रभारी मुख्याध्यापक सातत्याने अडथळा निर्माण करीत असल्याने दाखले देण्यास टाळाटाळ […]

शेतीचा वाद पेटला अन भावाने काकूसह भावाला संपवून घेतला टोकाचा निर्णय !

वर्धा : वृत्तसंस्था राज्यातील वर्धा जिल्ह्यातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. निमसडा गावात शेतीच्या धुऱ्याच्या वाटपावरून उद्भवलेल्या वादाने जीवघेणे वळण घेतले. एका चुलत भावाने आपल्या काकू आणि चुलत भावाची कुऱ्हाडीने निर्घृण हत्या केली आणि नंतर स्वतः विष प्राशन करून जीवनयात्रा संपवली. या धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. मृतांमध्ये साधना सुभाष मोहिजे (वय […]

संत ज्ञानेश्वर विद्यालय मध्ये दप्तर मुक्त आनंददायी शनिवार उपक्रम सुरू !

जळगाव : प्रतिनिधी श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये त्यांच्या वर्तन व जबाबदारीबाबत जागरूकता निर्माण व्हावी, चांगल्या सवयी, सहकार्यवृत्ती, नेतृत्व गुणांचा विकास व्हावा या हेतूने पहिली ते इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी महिन्यातील प्रत्येक दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी ‘आनंददायी शनिवार’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. तर्कसंगत विचार आणि कार्य करण्यासाठी सक्षम असणाऱ्या तसेच करुणा, सहानुभूती, […]

पतीला मारहाण करीत विवाहितेचा विनयभंग ; दोघांवर गुन्हा दाखल !

चाळीसगाव : प्रतिनिधी तालुक्यातील एका गावातील दिव्यांग व्यक्ती व त्यांच्या पत्नीला मारहाण करत विवाहितेचा विनयभंग केला. तसेच पोलिसांत तक्रार दिल्यास ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना २३ रोजी घडली असून या प्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, चाळीसगाव तालुक्यातील एका गावातील ४५ वर्षीय शेतकरी हे दोन्ही पायांनी […]

मुलीच्या घरी आई गेली अन नातवाने केला हल्ला !

जळगाव : प्रतिनिधी शेअर मार्केटमधील कर्जावरून झालेल्या वादातून नातवाने आपल्याच आजीच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करून तिला गंभीर जखमी केल्याची खळबळजनक घटना धरणगाव शहरात गुरूवारी २६ जून रोजी दुपारी सव्वा तीन वाजेच्या सुमारास घडली होती. या हल्ला वृध्द महिला ही गंभीर जखमी झाल्याने त्यांना जळगावातील खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात संशयित […]

औष्णिक विद्युत केंद्रात कामगाचाराचा जागीच मृत्यू !

भुसावळ : प्रतिनिधी दीपनगर औष्णिक विद्युत केंद्रात गुरुवारी (दि. २६ जून) रोजी कामाच्या दरम्यान झालेल्या अपघातात यशवंत भास्कर सोनवणे (वय अंदाजे ४०) या कंत्राटी कामगाराचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे फेकरी गावासह परिसरात शोककळा पसरली असून, प्रशासनाच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. सविस्तर वृत्त असे कि, मागील १२ वर्षांपासून सोनवणे हे कंत्राटदार धर्मेश पटेल यांच्या […]

तू शाहू नगरमध्ये कशी राहते, म्हणत शिवीगाळ !

जळगाव : प्रतिनिधी या परिसरात भाड्याची खोली घेऊन का राहते, असा जाब विचारत शकिलाबी शरीफ खान (४०, रा. शाहूनगर) यांच्यासह त्यांच्या मुलीला शिवीगाळ करीत मारहाण करण्यात आली. तसेच महिलेला चावा देखील घेण्यात आला. ही घटना २६ जून रोजी शाहूनगरात घडली. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे […]

आरपीएफ पथकाची मोठी कारवाई : आठ संशयितांना घेतले ताब्यात

भुसावळ : प्रतिनिधी भुसावळ रेल्वे स्थानकावर विविध गाड्यांमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून धमकावून पैसे वसूल करणाऱ्या किन्नरांच्या टोळीवर रेल्वे सुरक्षा बलाने (आरपीएफ) मोठी कारवाई करत आठ संशयितांना ताब्यात घेतले आहे. या टोळीकडून परप्रांतीय प्रवाशांना लक्ष्य करून त्यांच्याकडून रोख तसेच ऑनलाईन माध्यमातून जबरदस्तीने पैसे उकळले जात होते. सविस्तर वृत्त असे कि, या टोळीतील किन्नर प्रवाशांना धमकी देऊन […]

पारोळा तालुक्यात दोन दुचाकींचा भीषण अपघात तर रुग्णवाहिकेने देखील घेतला पेट !

पारोळा : प्रतिनिधी तालुक्यातील जोगलखेडे शिवारात दि. २७ रोजी ८ वाजेच्या सुमारास दोन दुचाकींचा समोरासमोर अपघात झाला. या अपघातात चार जण जखमी झाले आहेत. या जखमींना घेण्यासाठी गेलेल्या रुग्णवाहिकेलाही आग लागली. त्यात वाहन जळून खाक झाले. मिळालेल्या माहितीनुसार, जोगलखेडे शिवारात दोन मोटरसायकलींचा समोरासमोर अपघात झाला. त्यात विमल सुकल्या वसावे रा. वेलखेडी, जि. नंदुरबार, रोहन विश्राम […]

error: Content is protected !!