Home » जळगाव » विज्ञाननिष्ठ विचार देशाची प्रगतीचे साधन – डॉ. आयुब पिंजारी

विज्ञाननिष्ठ विचार देशाची प्रगतीचे साधन – डॉ. आयुब पिंजारी

गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे खाऱ्यापाडा गावातील जि. प. शाळेत अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रम संपन्न

जळगाव : प्रतिनिधी 

गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे खाऱ्यापाडा गावातील जिल्हा परिषद शाळेत अंधश्रद्धा निर्मूलन व वैज्ञानिक दृष्टिकोन जागृतीसाठी विशेष जनजागृती कार्यक्रम २७ नोव्हेंबरला आयोजित करण्यात आला होता. विद्यार्थ्यांमध्ये विज्ञाननिष्ठ विचार वाढावा, अंधश्रद्धा-अविश्वास दूर व्हावा आणि समाजात विवेकनिष्ठ वातावरण निर्माण व्हावे, या उद्देशाने हा उपक्रम घेण्यात आला. डॉ. आयुब पिंजारी यांनी विद्यार्थ्यांना विविध अंधश्रद्धांची उदाहरणे देत त्यामागील वैज्ञानिक कारणे सोप्या भाषेत सांगितली.

हातचलाखीचे प्रयोग, भोंदूबाबांच्या तथाकथित करामती मागील विज्ञान, तसेच अफवा-गैरसमज कसे निर्माण होतात याबाबत प्रात्यक्षिकेही दाखवण्यात आली. याप्रसंगी डॉ. अयुब्ब पिंजारी यांच्यासोबत मुख्याध्यापक विजय रोहिदास कच्छवे, जि.प. शिक्षक कैलास बारेला, रविंद्र पाटील, शिक्षिका सुनंदा विजय पाटील या शिक्षकांनीही सक्रियपणे सहभाग नोंदवला. चंद्रकांत चौधरी यांनी मान्यवरांचे स्वागत सूतीहाराने केला. गांधी रिसर्च फाउंडेशनचे स्वयंसेवक चंद्रकांत चौधरी यांनी महात्मा गांधी यांच्या विचारांतून विज्ञाननिष्ठता, सत्य, विवेकशीलता आणि सामाजिक सुधारणांचे महत्व अधोरेखित केले. विजय कच्छवे यांनी फाउंडेशनचे आभार मानून अशा कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये विचारशीलता वाढून त्यांना योग्य निर्णयक्षमतेची जाणीव होते, असे सांगितले. समारोपावेळी विद्यार्थ्यांना प्रश्नोत्तरातून आपल्या शंकांचे निरसरन केले.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *