Home » जळगाव » खळबळजनक : जळगावातील १६ वर्षीय मुलीने घेतली विहिरीत उडी !

खळबळजनक : जळगावातील १६ वर्षीय मुलीने घेतली विहिरीत उडी !

जळगाव : प्रतिनिधी

वडिलांनी रागविल्याने प्रज्ञा रवींद्र शिंदे (१६, रा. खेडी हुडको परिसर) या मुलीने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी (१९ जून) दुपारी १२ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून शनिपेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

सविस्तर वृत्त असे कि, सेंट्रिंग काम करणारे रवींद्र शिंदे हे पत्नी, तीन मुली व दोन मुलांसह खेडी हुडको परिसरात राहतात. त्यांची मुलगी प्रज्ञा ही बुधवारी (१८ जून) बाहेर गेली होती व रात्री ८ वाजता ती घरी आली. याबद्दल तिच्या वडिलांनी तिला विचारणा करीत रागावले वडिलांनी रागविल्याने चिडलेली प्रज्ञा कुणाला काहीही न सांगता पुन्हा घरातून निघून गेली. राहत्या घरापासून ५०० मीटर अंतरावर असलेल्या बैठक हॉलजवळ असलेल्या विहिरीत तिने उडी घेतली. गुरुवारी (१९ जून) दुपारी १२ वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. त्यानंतर प्रज्ञाचे नातेवाईक व शनिपेठ पोलिस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. काही नागरिकांच्या मदतीने मुलीला विहिरीतून बाहेर काढून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी मयत घोषित केले. मुलीचा मृतदेह पाहताच तिच्या आई-वडिलांनी मोठा आक्रोश केला. या प्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *