Home » राष्ट्रीय » १ ते १९ डिसेंबर अधिवेशन; राहुल गांधींचे आरोप चर्चेचे केंद्रबिंदू ठरणार

१ ते १९ डिसेंबर अधिवेशन; राहुल गांधींचे आरोप चर्चेचे केंद्रबिंदू ठरणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी शनिवारी जाहीर केले की, संसदेचे हिवाळी अधिवेशन १ डिसेंबरपासून सुरू होणार असून ते १९ डिसेंबरपर्यंत चालणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सरकारच्या प्रस्तावाला मान्यता दिल्याची माहिती रिजिजू यांनी एक्सवरील पोस्टद्वारे दिली.

दरम्यान, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर गंभीर आरोप करत राजकीय वातावरण तापवले आहे. “मोदी निवडणुका चोरून पंतप्रधान झाले असून, आमच्याकडे याचे पुरावे आहेत,” असा दावा राहुल गांधींनी केला आहे. त्यांनी मोदी, अमित शहा आणि निवडणूक आयोगावर राज्यघटनेवर हल्ला केल्याचा आरोपही केला आहे. त्यामुळे आगामी हिवाळी अधिवेशन या आरोप-प्रत्यारोपांनी गाजण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *