Home » जळगाव » जळगावात चेन स्नॅचिंगची धक्कादायक घटना : ५४ वर्षीय महिलेकडून सोन्याचे दागिने लांबवले !

जळगावात चेन स्नॅचिंगची धक्कादायक घटना : ५४ वर्षीय महिलेकडून सोन्याचे दागिने लांबवले !

जळगाव : प्रतिनिधी

जळगाव शहरात गेल्या काही दिवसांपासून चेन स्नॅचिंगच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली असून, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. अशाच एका घटनेत शहरातील शिवशक्ती नगर परिसरात सोमवारी (३ नोव्हेंबर) रात्री दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी ५४ वर्षीय महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून नेले.

मिळालेल्या माहितीनुसार, उषाबाई देविदास बोरसे (वय ५४, रा. शिवशक्ती नगर) या आपल्या नातीसोबत रात्री ९ वाजून १० मिनिटांनी घराकडे चालत जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांना अडवले. त्यानंतर त्यांच्या गळ्यातील १ लाख २३ हजार रुपये किमतीचे सोन्याचे मिनी मंगळसूत्र आणि पदक ओढून चोरट्यांनी क्षणात पळ काढला. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, उषाबाई बोरसे यांनी तत्काळ जळगाव तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून दोन अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक धनराज अजबराव पाटील करीत आहेत.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *