Home » राज्य » खळबळजनक : मुख्याध्यापकाने विहिरीत उडी घेत संपविले आयुष्य !

खळबळजनक : मुख्याध्यापकाने विहिरीत उडी घेत संपविले आयुष्य !

कोल्हापूर : वृत्तसंस्था

राज्यातील कोल्हापूरमधील कागल तालुक्यात एका मुख्याध्यापकाने विहिरीत उडी घेऊन जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी मृतदेह बाहेर काढून तपास सुरू केला असून परिसरात खळबळ उडाली आहे.

मारुती व्हरकट असे आत्महत्या करणाऱ्या मुख्याध्यापकाचे नाव आहे. त्यांनी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची माहिती मिळताच पोलिस व नगरपालिका प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन विभागाच्या जवानांच्या मदतीने त्यांचा मृतदेह विहरीतून बाहेर काढण्यात आला. मारुती व्हरकरट हे कागल नगरपालिकेच्या शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते. त्यामुळे व्हरकट यांच्या आत्महत्येचे कारण काय? असा प्रश्न कुटुबीयांसह नातेवाईकांना पडला आहे.

 

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *