Home » जळगाव » धक्कादायक : जळगावात विवाहितेचा संशयास्पद मृत्यू : नातेवाईकांचा गंभीर आरोप !

धक्कादायक : जळगावात विवाहितेचा संशयास्पद मृत्यू : नातेवाईकांचा गंभीर आरोप !

जळगाव : प्रतिनिधी

शहरातील अक्सानगरमधील हमीदाबी जावेद कुरेशी (३०, रा. अक्सानगर) या विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी (१५ नोव्हेंबर) रात्री उघडकीस आली. रविवारी सकाळी माहेरची मंडळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पोहोचली. या सासरच्या ठिकाणी त्यांनी मंडळींविरुद्ध संताप व्यक्त करीत पैशांसाठी पतीसह सासरच्या मंडळींनी मुलीला गळफास देऊन मारल्याचा आरोप केला.

हमीदाबी आत्महत्येचा प्रकार लक्षात आल्यानंतर विवाहितेला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले. मुलीने आत्महत्या केली नसून तिच्या पती आणि सासरच्या मंडळींनी मारहाण करून गळफास दिल्याचा आरोप विवाहितेची आई जरीनाबी शेख हुसेन, वडील शेख हुसेन शेख इब्राहिम, भाऊ शेख हसन शेख हुसेन यांनी केला. दोषींना अटक करून त्यांना कठोरात कठोर शिक्षा करावी, अशीही मागणी त्यांनी केली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *