“काँग्रेसच्या सल्लागारांचे अंदाज चुकीचे” ; पृथ्वीराज चव्हाणांचा थेट आरोप

मुंबई : वृत्तसंस्था बिहार निवडणुकीच्या निकालांनंतर काँग्रेसच्या पराभवावर विविध प्रतिक्रिया उमटत असताना, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पक्षाच्या रणनीती, सल्लागारांचे अंदाज आणि जागावाटपातील चुका यावर स्पष्टपणे टीका केली आहे. एका वृत्तसंस्थेशी बोलताना त्यांनी काँग्रेसच्या अंतर्गत गोंधळावर थेट बोट ठेवले. चव्हाण म्हणाले की, “मी बिहारला गेलो नाही, त्यामुळे संपूर्ण राज्यावर भाष्य करणे उचित नाही. पण काँग्रेसच्या […]
पालघरमध्ये शिक्षेमुळे विद्यार्थिनीचा मृत्यू? अंशिकाच्या मृत्यूने संतापाची लाट

पालघर : वृत्तसंस्था पालघर जिल्ह्यातील वसई परिसरातील एका खासगी शाळेत सहावीत शिकणारी १३ वर्षांची विद्यार्थिनी अंशिका गौर हिचा १५ नोव्हेंबर रोजी मृत्यू झाला. गेल्या आठवड्यापासून ती रुग्णालयात उपचार घेत होती. कुटुंबीयांचा गंभीर आरोप आहे की, शाळेत देण्यात आलेल्या शिक्षेमुळेच मुलीची प्रकृती खालावली आणि अखेर तिचा मृत्यू झाला. प्रशासनाने या घटनेची चौकशी सुरू केली आहे. अंशिका […]
बांगलादेश हादरला : माजी पंतप्रधान शेख हसिनांना मृत्युदंडाची शिक्षा!

नवी दिल्ली : वृत्तसंस्था आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाने बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसिना यांना दोषी ठरवत मृत्युदंडाची शिक्षा सुनावली आहे. न्यायमूर्ती गुलाम मुर्तझा यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने सुमारे ४०० पानी तपशीलवार निकाल दिला आहे. सुनावणीदरम्यान मानवाधिकार संघटनांच्या अहवालांसह विविध संस्थांकडून मिळालेल्या दस्तऐवजांचा सखोल अभ्यास करण्यात आल्याचे न्यायालयाने नमूद केले. न्यायाधिकरणाने मोठ्या प्रमाणात निदर्शकांचे मृत्यू आणि […]
प्रफुल्ल पटेलांच्या विधानावर नाना पटोलेंचा घणाघात :“पैशावरच राजकारण केलं” !

नागपूर : वृत्तसंस्था राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्या वक्तव्याची सध्या चांगलीच चर्चा होत आहे. लोक पैसे घेऊन दुसऱ्यालाच मत देतात, असं वक्तव्य पटेलांनी केले. त्यांच्या या विधानानंतर विरोधकांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. यावर काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रफुल पटेलांनी आजपर्यंत पैशाच्याचं भरोशावर राजकारण केलं आणि निवडणुका जिंकल्या आहेत. यापुढेही […]
भीषण अपघात : भरधाव क्रेन रिक्षाला धडकला : एकाचा मृत्यू !

भुसावळ : प्रतिनिधी तालुक्यातील वरणगावजवळील महामार्गावर सकाळी नऊ वाजेच्या सुमारास एक दुर्दैवी अपघात घडला. मुक्ताईनगरकडून भरधाव वेगाने राँग साईडने येत असलेल्या क्रेनने समोरून येणाऱ्या रिक्षाला ठोकल्याने रिक्षा चालक अशपाक अहमद तस्सुफ (वय ४६, रा. अक्सानगर, जळगाव) यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी वरणगांव पोलिसात क्रेन चालकाविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, मृतक अशपाक […]
धक्कादायक : विषारी सापाने घेतला वृद्ध महिलेचा जीव !

जळगाव : प्रतिनिधी विषारी साप चावल्यामुळे उपचार सुरु असलेल्या अनिता शांताराम पाटील (वय ६०, रा. नांद्रा बु. ता. जळगाव) यांचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी उघडकीस आली. याप्रकरणी तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सविस्तर वृत्त असे कि, तालुक्यातील नांद्रा बु. येथे अनिता पाटील या वृद्ध महिला वास्तव्यास होत्या. घरी असतांना त्यांना साप […]
धक्कादायक : जळगावात विवाहितेचा संशयास्पद मृत्यू : नातेवाईकांचा गंभीर आरोप !

जळगाव : प्रतिनिधी शहरातील अक्सानगरमधील हमीदाबी जावेद कुरेशी (३०, रा. अक्सानगर) या विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी (१५ नोव्हेंबर) रात्री उघडकीस आली. रविवारी सकाळी माहेरची मंडळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पोहोचली. या सासरच्या ठिकाणी त्यांनी मंडळींविरुद्ध संताप व्यक्त करीत पैशांसाठी पतीसह सासरच्या मंडळींनी मुलीला गळफास देऊन मारल्याचा आरोप केला. हमीदाबी आत्महत्येचा […]
खोट्या कॉलने भुसावळ पोलिसांची धावपळ; एकाविरुद्ध गुन्हा दाखल

भुसावळ : प्रतिनिधी शहरात शनिवारी दुपारी डायल 112 या आपत्कालीन सेवेला आलेल्या एका खोट्या कॉलमुळे पोलिसांची चांगलीच धांदल उडाली. शांतीनगर पाण्याच्या टाकीजवळील एन. के. नारखेडे इंग्लिश मीडियम स्कूल परिसरात दुपारी सुमारे 1.15 वाजता प्राप्त झालेल्या या कॉलमध्ये गंभीर माहिती देण्यात आली होती. सुरक्षेच्या दृष्टीने कोणताही धोका टाळण्यासाठी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तथापि, तपासादरम्यान या […]
तुम्हाला अचानक अशी एखादी गोष्ट मिळू शकते ज्याची तुम्ही खूप आतुरतेने वाट पाहत होता

आजचे राशिभविष्य दि. १७ नोव्हेंबर २०२५ मेष राशी आज तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद मिळेल. मालमत्तेच्या बाबतीत निर्णय तुमच्या बाजूने होतील. तुमचे विरोधकही तुमच्याकडे मैत्रीचा हात पुढे करतील. वृषभ राशी जर तुम्ही सौंदर्यप्रसाधनांचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल, तर आजचा दिवस खूप चांगला आहे. या राशीखाली जन्मलेल्या वकिलांचा दिवस खूप चांगला जाईल. मिथुन राशी […]