जळगाव : प्रतिनिधी
रस्ता ओलांडून डिझेल भरण्यासाठी पेट्रोलपंपावर जाणाऱ्या रिक्षाला भरधाव कारने धडक दिल्यामुळे रिक्षाचालकासह पाच जण जखमी झाले. हा अपघात १५ ऑगस्ट रोजी रात्री विमानतळाच्या पुढे झाला. याप्रकरणी कारचालकाविरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

रिक्षाचालक साहिल राजेंद्र भोई (२२, रा. खडकी, ता. जामनेर) हे रिक्षामध्ये (क्र. एमएच १९ बीएम ०५४६) घरगुती साहित्य घेऊन जळगावकडून जामनेरकडे जात होते. कुसुंबा गावानजीक पेट्रोलपंपावर डिझेल भरण्यासाठी रिक्षा उजव्या बाजूला वळवून रस्ता ओलांडत असताना भरधाव कारने (क्र. एमएच १९ सीझेड ९७५१) रिक्षाला धडक दिली



