Home » जळगाव » भरधाव ट्रकची मालवाहूला जबर धडक : जळगावातील चालक ठार !

भरधाव ट्रकची मालवाहूला जबर धडक : जळगावातील चालक ठार !

जळगाव : प्रतिनिधी

भरधाव ट्रकने मालवाहू वाहनाला धडक दिल्यामुळे चालक राजू गुलाब ओतारी (रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव) हे जागीच ठार झाले. नंतर या ट्रकने रिक्षालादेखील धडक दिल्याने त्यातील तीनजण जखमी झाले. हा अपघात रविवारी (१५ जून) पहाटे तीन वाजेच्या सुमारास भुसावळ तालुक्यातील फुलगावजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळकडून वरणगावकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने (एमएच ३७, टी ६७७१) मालवाहू वाहनाला (एमएच १९, सीवाय ४५७६) धडक दिली. यात मालवाहू वाहनचालक राजू ओतारी हे जागीच ठार झाले. याच ट्रकने पुढे जाऊन रिक्षालादेखील (एमएच १९, सीडब्ल्यू २९५०) मागून धडक दिली व तिला फरफटत नेली. त्यात तीनजण जखमी झाले. याप्रकरणी रिक्षाचालक अमोल चौधरी (३३, रा. वरणगाव) यांच्या फिर्यादीवरून ट्रकचालक अजहर खान तिरुद्ध गन्हा दाखल केला आहे

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *