Home » जळगाव » भरधाव वाहनाची दुचाकीला जबर धडक : महिलेचा मृत्यू !

भरधाव वाहनाची दुचाकीला जबर धडक : महिलेचा मृत्यू !

जळगाव : प्रतिनिधी

दाम्पत्य सावखेडासीम येथे गावी जात असतांना भरधाव वेगाने येणाऱ्या मालवाहू वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात संजिदा जुम्मा तडवी (वय ४२, रा. सावखेडा सीम, ता. यावल) यांचा मृत्यू झाला. ही घटना दि. २७ जून रोजी ममुराबाद रोडवरील प्रजापत नगरजवळ घडली होती. याप्रकरणी तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे कि, यावल तालुक्यातील सावखेडासीम येथे राहणारे जुम्मा फकीरा तडवी (वय ४२) हे वास्तव्यास असून ते दि. २७ रोजी (एमएच १९, ईएल २५८२) क्रमांकाच्या दुचाकीने पत्नी संजिदा  तडवी यांच्यासोबत गावाकडे जात होते. यावेळी ममुराबाद रोडवरील प्रजापत नगराकडून जात असतांना ममुराबादकडून जळगावकडे भरधाव वेगाने येणाऱ्या एका मालवाहू वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. यामध्ये दुचाकीवरील दाम्पत्य गंभीर जखमी झाले. या अपधातात संजिदा तडवी यांना गंभीर दुखापत होवून त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला. दरम्यान, जुम्मा फकीरा तडवी यांनी तालुका पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार धडक देणाऱ्या मालवाहू वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ प्रदीप राजपूत हे करीत आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *