जळगाव, दि. ३ ऑक्टोबर २०२५ –
एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीतील एका गंभीर खुनाच्या गुन्ह्यात पाहीजे असलेला मुख्य आरोपी नामे योगेश संतोष पाटील उर्फ पिंटू (वय २७, रा. कासमवाडी, जळगाव) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या काही तासांत नशिराबाद परिसरातून शिताफीने अटक केली. आरोपीस पुढील कारवाईसाठी एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

दि. ०३/१०/२०२५ रोजी सीसीटीएनएस गु.र. नं. ७०६/२०२५, भारतीय नवसंहितेतील कलम १०३ अंतर्गत दाखल खुनाच्या गुन्ह्यात आरोपी फरार होता. या प्रकरणाचा तात्काळ तपास करून आरोपीला अटक करण्याचे आदेश मा. डॉ. श्री महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक, जळगाव यांनी मा. श्री राहुल गायकवाड, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांना दिले.
या आदेशानुसार पोलीस निरीक्षक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोह. नितीन बाविस्कर, पोना. किशोर पाटील, पोकॅ. छगन तायडे, पोकॉ. रविंद्र कापडणे यांच्या पथकाने कामाला सुरुवात केली. गोपनीय माहितीच्या आधारे केलेल्या शिताफीने कारवाईत, नशिराबाद परिसरातून आरोपीला ताब्यात घेण्यात आले. ही यशस्वी कारवाई मा. डॉ. महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक, जळगाव, मा. अशोक नखाते, अपर पोलीस अधीक्षक, तसेच मा. नितीन गणापुरे, उपविभागीय पोलीस अधिकारी, जळगाव विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पोलीस प्रशासनाच्या या तत्पर कारवाईमुळे खुनाच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपीला ताब्यात घेण्यात यश मिळाले असून, या पुढील तपास एमआयडीसी पोलीस करत आहेत.



