September 29, 2026 12:41 am

लाईव्ह न्यूज :
लाईव्ह न्यूज :

उद्धव ठाकरेंनी माझे एक हजार रुपये वाचविले ; मुख्यमंत्र्यांनी केले होते आवाहन !

मुंबई : वृत्तसंस्था उद्धव ठाकरे यांच्या विकासाच्या मुद्यावर कोणताही उहापोह झाला नाही. त्यामुळे माझे 1 हजार रुपये वाचले, असा उपरोधिक टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना हाणला. उद्धव ठाकरे यांचा गुरूवारी दसरा मेळावा झाला. त्यात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोचरी टीका केली होती. मी मुख्यमंत्री […]

जरांगे तिसरी – चौथी शिकलेला माणूस ; लक्ष्मण हाके आक्रमक !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात आरक्षणाचा मुद्दा तापला असून यात ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी शुक्रवारी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील वयांच्यावर निशाणा साधला आहे. मनोज जरांगे हा एक मनोरुग्ण माणूस आहे. मराठा समाजाने असा मूर्ख माणूस आपला नेता म्हणून कसा निवडला हेच समजत नाही, असे ते म्हणालेत. हाके यांच्या या विधानामुळे जरांगे व त्यांच्यातील वाद […]

तुम्ही तर त्यांच्यासारखे दिसतही नाहीत. ; मनोज जरांगे पाटलांचा हल्लाबोल !

छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था छत्रपती संभाजीनगर येथे प्रकृती बरी नसल्याने मराठा समाजाचे प्रणेते मनोज जरांगे हे उपचार घेत आहेत. राज्यात विविध दसरा मेळावे पार पडले. बीडमध्ये दोन दसरा मेळावे पार पडले. एक मनोज जरांगे यांचा दसरा मेळावा बीड जिल्ह्यातील नारायण गडावर तर पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा सावरगाव येथील भगवान भक्तीगडावर पार पडला. दोन्ही मेळाव्याला […]

आय लव्ह महादेवच्या बॅनर : मंत्री राणेंनी पुन्हा डिवचले !

छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसापासून राज्यातील राजकीय वातावरण अनेक माध्यमातून दुषित होत असताना आता मंत्री नितेश राणे यांनी मोठे विधान केले आहे. आय लव्ह महंम्मदला उत्तर हे आता आय लव्ह महादेवच्या बॅनरने द्या. ही महादेवाची पावण भूमी आहे. त्यामुळे देशातील प्रत्येक गल्ल्या आणि घरांमध्ये आय लव्ह महादेवचीच पोस्टर लावा, महंम्मदवाल्यांना पाकिस्तानमध्ये पाठवा, असे […]

एलसीबीची यशस्वी कामगिरी : मुख्य खुनाचा आरोपी अवघ्या काही तासांत जेरबंद !

जळगाव, दि. ३ ऑक्टोबर २०२५ – एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीतील एका गंभीर खुनाच्या गुन्ह्यात पाहीजे असलेला मुख्य आरोपी नामे योगेश संतोष पाटील उर्फ पिंटू (वय २७, रा. कासमवाडी, जळगाव) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या काही तासांत नशिराबाद परिसरातून शिताफीने अटक केली. आरोपीस पुढील कारवाईसाठी एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. दि. ०३/१०/२०२५ रोजी […]

दुर्गा मूर्तींच्या विसर्जन सुरु असताना ११ जण उत्तांग नदीत बुडाले !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशभरात नुकताच दसरा सण मोठ्या उत्साहात साजरा झाला असून उत्तर प्रदेशातील आग्रा येथे दुर्गा मूर्तींच्या विसर्जनादरम्यान एक मोठा अपघात घडला. काल कुसियापूर गावातील ११ जण खेरागडमधील डुंगरवाला जवळील उत्तांग नदीत बुडाल्याची माहिती समोर आली आहे. तर त्यानंतर काही वेळातच तिघांना वाचवण्यात आले आणि आग्राला जाताना दोघांचा मृत्यू झाला. इतरांचा शोध रात्री […]

कुणीही खचून जावू नका आम्ही तुमच्या पाठीशी ; अजित पवारांनी दिला धीर !

अहिल्यानगर : वृत्तसंस्था राज्यातील मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसाच्या हाहाकारामुळे अनेकांचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात सर्वदूर पाऊस पडल्याने मोठे नुकसान झाले असून, पंचनाम्याच्या सूचना दिल्या आहेत. दिवाळीच्या आत नुकसानभरपाई खात्यावर जमा करण्यात येईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्रिमंडळ तुमच्या पाठीशी आहे, असा आधार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांना दिला. पारनेर येथे […]

बनावट क्रेडीट कार्ड विभागातून फोन अन तरुणाला बसला लाखोंचा फटका !

जळगाव : प्रतिनिधी शहरातील एका तरुण नोकरदाराला एका अज्ञाताने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या क्रेडिट कार्ड विभागातून बोलत असल्याचे भासवून १ लाख ३२ हजार रुपयांचा गंडा घातल्याची घटना १ ऑक्टोबर, बुधवारी उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे, फिर्यादीने आरोपीला कोणतीही माहिती दिली नसतानाही ही फसवणूक झाली. मिळालेल्या माहितीनुसार, निमखेडी रोड, शिवधाम मंदिर परिसरात राहणारे प्रणेश प्रकाश ठाकूर […]

जळगावात खळबळ : जुना वाद भिडला अन तरुणाचा गेला जीव

जळगाव : प्रतिनिधी शहरातील कासमवाडी परिसरात जुन्या वादातून एका तरुणावर दोघांनी धारदार तलवार आणि कोयत्याने वार करून निर्घुण हत्या करण्यात आल्याची घटना शुक्रवारी ३ ऑक्टोबर रोजी रात्री १२.३० वाजेच्या सुमारास घडली. ज्ञानेश्वर उर्फ नाना भिका पाटील वय-२७ रा. कासमवाडी असे मयत तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील कासमवाडी परिसरात राहणाऱ्या ज्ञानेश्वर उर्फ नाना भीकन […]

मनाची शांती मिळविण्यासाठी तुम्ही धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात वेळ घालवाल.

आजचे राशिभविष्य दि.३ ऑक्टोबर २०२५ मेष राशी आजचा दिवस उत्तम जाईल. विद्यार्थी त्यांच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करतील. आज एखाद्या खास कारणासाठी प्रवासाचे नियोजन केले जाऊ शकते. जवळचे नातेवाईक भेट देतील आणि घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल. कुटुंबातील वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घ्या आणि त्यांना आदर आणि सन्मान द्या. वृषभ राशी सध्याच्या कामाच्या पद्धतीत कोणताही बदल करण्याचा प्रयत्न […]

error: Content is protected !!