Home » जळगाव » देवकर कॉलेजमध्ये नर्सिंग विद्यार्थिनीचा अचानक मृत्यू; परिसरात हळहळ

देवकर कॉलेजमध्ये नर्सिंग विद्यार्थिनीचा अचानक मृत्यू; परिसरात हळहळ

जळगाव : प्रतिनिधी

नर्सिंगचे शिक्षण घेत असलेल्या महिमा चंदन वासनिक (वय १९, रा. देवकर कॉलेज) या विद्यार्थीनीचा हॉटेलमध्ये चक्कर येवून पडल्याने मृत्यू झाला. ही घटना रविवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास देवकर कॉलेजमध्ये घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,  शहरातील शिरसोली रस्त्यावर असलेल्या देवकर कॉलेजमध्ये महिमा वासनिक ही विद्यार्थीनी नर्सिंगचे शिक्षण घेत होती रविवारी दुपारच्या सुमारास कपडे धुतल्यानंतर तीला अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे ती होस्टलवर आली. यावेळी तीला अचानक चक्कर येवून पडल्याने तीला सोबत असलेल्या मैत्रीनींनी तात्काळ जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करीत महिला हीला मयत घोषीत केले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *