Home » जळगाव » घातपाताचा संशय : आसोदा रस्त्यावर अपघात : तरुणाचा जागीच मृत्यू !

घातपाताचा संशय : आसोदा रस्त्यावर अपघात : तरुणाचा जागीच मृत्यू !

जळगाव : प्रतिनिधी

दुकानावर येण्यासाठी निघालेल्या तरुणाला मागून भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीने धडक दिली. या अपधातात मोहम्मद इब्राहीम खाटीक (वय ३८, रा.भादली, ता. जळगाव) याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी सकाळी ११ वाजता आसोदा रस्त्यावर घडली. तरुणाचा जीव घेण्यासाठीच हा पुर्वनियोजीत कट असल्याचा आरोप मयताच्या नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात केला. त्यानुसार पोलिसांनी तपासचक्रे फिरवली आहे. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

सविस्तर वृत्त असे कि, भादली येथील मोहम्मद इब्राहीम खाटीक या युवकाचा शहरातील महात्मा गांधी मार्केटमध्ये कापड विक्रीचा व्यवसाय आहे. सकाळी नियमिपणे मोहम्मद खाटीक आपल्या दुचाकीने जळगावकडे जाण्यासाठी निघाला. त्याचवेळी त्याच्या दुकानात काम करणारे गावातील दोन युवकही दुसऱ्या दुचाकीने मोहम्मद खाटीकच्या मागेच निघाले. सकाळी ११ वाजता आसोदा रस्त्यालगत असलेल्या एका पेट्रोलपंपासमोरच भादली येथील दीपक धनगर हा आपल्या चारचाकी कार घेवून त्यांच्या मागून आला. त्याने पुढे चालणाऱ्या मोहम्मद खाटीकच्या दुचाकीला जोरदार धडक दिली, त्यात मोहम्मद खाटीकच्या छातीवरुन कार गेल्यामुळे तो गंभीर जखमी झाला. मागून येत असलेल्या मोहम्मदच्या मित्रांनी लगेच, जखमी मोहम्मदला त्याच कारमधून जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर खासगी रुग्णालयात त्याला हलविले. दुपारी ३ वाजता उपचारादरम्यान मोहम्मदचा मृत्यू झाला.

मृत्यूची माहिती मिळताच नातेवाईकांसह भादली येथील ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात जिल्हा रुग्णालयात गर्दी केली होती. मोहम्मद लहान असतानाच त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे कुटुंबाची संपुर्ण जबाबदारी ही मोहम्मद खाटीकवर आली होती. कपडे विक्री करुन कुटुंबाचा उदनिर्वाह करीत होता. त्याच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे.

मयताच्या नातेवाईकांकडून घातपाताचा संशय व्यक्त केला जात होता. त्यामुळे पोलिसांनी या घटनेची गंभीररित्या दखल घेत तात्काळ तालुका पोलिसांनी घटनास्थळी जाऊन, सीसीटीव्ही तपासण्याचे काम सुरु केले होते. रात्री उशीरापर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *