Home » राष्ट्रीय » वसुली करणाऱ्या तिघा वाहतूक पोलिसांवर निलंबनाची कारवाई !

वसुली करणाऱ्या तिघा वाहतूक पोलिसांवर निलंबनाची कारवाई !

जळगाव : प्रतिनिधी

पाचोरा तालुक्यातील मालवाहू वाहन चालकाकडून ५० रुपये घेतांनाचा व्हीडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. या व्हीडीओमुळे पोलिसांच्या खाकी डागाळल्यामुळे पोलीस अधीक्षकांनी त्याची गंभीर दखल घेत भरदिवसा वाहन चालकांकडून पैसे घेणाऱ्या पाचोरा पोलीस ठाण्यातील वाहतुक पोलीस पवनकुमार पाटीलसह सहा. फौ. गुलाब मनोरे, पो.हे. कॉ. चेतन सोनवणे या तिघांना निलंबीत केले. याबाबतचे आदेश पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी काढले आहेत.

सविस्तर वृत्त असे कि, कजगाव येथून जात असलेल्या भडगाव-पाचोरा रस्त्यावरुन केळीची वाहतुक करणाऱ्या वाहनाला वाहतुक पोलिसाने थांबवले. त्या वाहतूक पोलिसाने वाहन चालकाकडे पैशांची मागणी केली. त्यावेळी वाहनाच्या टपावर बसलेल्या एकाने त्या पोलीस कर्मचाऱ्याला आम्ही येथून दररोज जातो असे सांगितले. त्यावर पोलिसाने त्यांच्याकडे पैशांसाठी तगादा लावल्यामुळे त्या वाहन चालकाने पोलिसाला पन्नास रुपये दिले. त्यावर पोलिसाने अजून पैसे वाढवून देण्याची मागणी केली. पैसे मागण्यासह पैसे देतांनाचे संपुर्ण संभाषण टपावर बसलेल्या इसमाने आपल्या मोबाईलमध्ये कैद केले. पन्नास रुपये घेतांना रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला उभे असलेले इतर दोन वाहतूक पोलिसांनी देखील मालवाहू वाहन थांबवल्याचे व्हीडीओमध्ये कैद झाले आहे. वाहतुक पोलिसांचा पैसे घेतांना हा व्हीडीओ व्हायरल झाल्यामुळे पोलिसांची खाकी पुन्हा डागाळली गेली होती.

पैसे घेणाऱ्यासह वाहनावर कारवाई करणाऱ्या तिघ पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबीत करण्यासह त्यांची खात्यातंर्गत प्राथमिक चौकशी पाचोरा उपविभागीय पोलीस अधिकारी वेरुळे यांच्याकडे देण्यात आली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिली

 

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *