चाळीसगाव : प्रतिनिधी
पिलखोडच्या गिरणा नदीपात्रात पहाटे महादेव मंदिर व आसारांजवळ दोन तलवारी, दोन कोयते आढळून आले असून, मेहुणबारे पोलिसांनी ते जप्त केले आहेत. घटनेची माहिती पोलिस पाटील प्रशांत पाटील यांनी मेहुणबारे पोलिस स्टेशनचे सपोनि प्रवीण दात्रे यांना दिली. त्यानुसार हेकॉ. मोहन सोनवणे, तसेच बाबासाहेब पगारे, भूषण बाविस्कर, प्रशांत खैरे यांनी घटनास्थळी येऊन तलवारी व कोयत्यांचा पंचनामा करून ताब्यात घेतले. चाळीसगाव येथे २६ रोजी माजी नगरसेवक प्रभाकर चौधरी यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला.
या हल्ल्यातील मारेकरी हे तलवारी व कोयते फेकून पसार झाले असावेत, असे येथील काही ग्रामस्थांचे म्हणणे आहे. हे कोयते व तलवारी या पात्रात कोणी टाकून दिल्या, याबाबत तपास सपोनि. प्रवीण दात्रे व मेहुणबारे पोलिस करत आहेत.
