Home » जळगाव » जळगावात शिक्षीकेने विद्यार्थ्याला चापटांनी मारहाण !

जळगावात शिक्षीकेने विद्यार्थ्याला चापटांनी मारहाण !

जळगाव : प्रतिनिधी

शहरातील अभिनव शाळेत दि. ८ रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास शाळेतील विद्यार्थ्यांच्या भांडणाच्या कारणावरुन शाळेतील शिक्षीकेने विद्यार्थ्याला चापटांनी मारहाण करीत पोटाला चिमटा काढला. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसात शिक्षीकेविरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्य माहितीनुसार, शहरातील शाहू नगरातील भिस्ती मोहल्ल येथे शरिफा सत्तार भिस्ती या महिला वास्तव्यास आहे. त्यांचा मुलगा मोहम्मद अजहर शेख इकबाल हा अभिनव शाळेत इयत्ता नववीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. दि. ८ रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास मोहम्मद अजहर याचे वर्गातील मुलांसोबत भांडण झाले. या भांडणाच्या कारणावरुन त्यांच्या वर्गशिक्षीका निता शैलेश पाटील यांनी त्या मुलाला चापटांनी मारहाण करीत पोटाला चिमटा घेतला. हा प्रकार त्या मुलाने आपल्या आईला सांतगितल्यानंतर त्याच्या आईने लागलीच जिल्हापेठ पोलीसात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार वर्गशिक्षका निता पाटील यांच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *